क्राईम

शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; दातच पाडले…

पाबळ (सुनिल जिते) :  शेतात घुसलेली जनावरे बाजूला घेऊन बांधण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका ८० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथे घडली आहे. या मारहाणीत वृद्धाचा एक दात पडला असून तीन दात निकामी झाले आहेत. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाजीराव काशीबा पोकळे (वय ८० वर्षे, धंदा-शेती, रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून संजय शिवराम पोकळे व सुनील शिवराम पोकळे (दोघे रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाजीराव पोकळे हे २० मे रोजी संध्याकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास कवठे यमाई येथील आपल्या शेतात होते. त्या वेळी त्यांना शेतात आरोपी संजय पोकळे याची जनावरे दिसली. बाजीराव यांनी संजयला ‘तुझी जनावरे माझ्या शेतात आली आहेत, ती बाजूला नेऊन बांध’ असे सांगितले. याचा राग आल्याने संजय याने ‘मी जनावरे बांधणार नाही’ असे म्हणून चिडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बाजीराव यांनी शिवीगाळ का करतो? असे विचारल्याचा अधिक राग आल्याने, संजयने जवळ पडलेला दगड हातात घेऊन बाजीराव यांच्या कपाळावर व तोंडावर मारून गंभीर दुखापत केली. तसेच उजव्या पायाच्या पोटरीवर मारून जखमी केले. हा वाद सुरू असतानाच संजयचा भाऊ सुनील शिवराम पोकळे हा त्या ठिकाणी आला. त्यानेही बाजीराव यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची दमदाटी केली. या मारहाणीत तोंडात दगड लागल्यामुळे बाजीराव पोकळे यांचा वरचा एक दात पडून गंभीर दुखापत झाली, तर खालचे तीन दात हलून निकामी झाले आहेत.

बाजीराव पोकळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पोलिसांनी संजय पोकळे व सुनील पोकळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ३५१(२)(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दुचाकी चोरीचे वाढले प्रमाण…

शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भरदिवसा मंगळसूत्र हिसकावले…

शिरुर तालुक्यात HDFC बँकेत बनावट सोन्याचा लाखोंचा गोल्ड लोन घोटाळा; बारा जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरुर तालुक्याचा बुलंद आवाज ; www.shirurtaluka.com ची यशस्वी १५ वर्षे…

पुणे ग्रामीण ATS ची धडक कारवाई; ‘पुष्पा’ स्टाईल चंदन तस्करीचे पुणे कनेक्शन उघड, २८ लाख रुपयांचा चंदनसाठा जप्त

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

4 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

5 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

5 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

5 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

6 तास ago

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदतीची मागणी; सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणाच्या भूमिपूजनासाठीही मागितली वेळ मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त…

6 तास ago