न्हावरे (प्रतिनिधी) निमोणे गावचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच पांडुरंग विठोबा दुर्गे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने निमोणे गावासह शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. निमोणेचे ग्रामपंचायत सदस्य अतुल दुर्गे यांचे ते वडील होते.
पांडुरंग दुर्गे हे अत्यंत शांत, मनमिळाऊ, निष्ठावान आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांनी निमोणे गावचे सरपंच म्हणून काम करताना गावात आठवडा बाजार सुरु करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच निमोणे विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून अनेक शेतकऱ्यांना कर्ज सहाय्य मिळवून दिले. गावात स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सुरु करण्यासाठीही त्यांचे मोठे योगदान होते.
निमोणे गावातील मारुती मंदिर व खंडोबा मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. सहकार, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचे ते विश्वासू सहकारी होते.
आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…
मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…
मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…
मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…