रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव M.I.D.C परिसरातील औद्योगिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, कामगार सुरक्षा तसेच कंपन्यांमधील विविध अडचणी जाणून घेण्यासाठी रांजणगाव M.I.D.C पोलीस स्टेशनच्या वतीने कंपनी प्रतिनिधींची दि ३ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ ते ४.३० या वेळेत समन्वय बैठक रिया मीटिंग हॉल, रांजणगाव M.I.D.C येथे पार पडली.
या बैठकीत औद्योगिक परिसरातील कंपन्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, कामगारांशी संबंधित प्रश्न, कॉन्ट्रॅक्ट संदर्भातील वाद, खंडणीसारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध, महिला सुरक्षेचे प्रश्न तसेच सायबर गुन्ह्यांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. पोलीस प्रशासन आणि उद्योग व्यावसायिक यांच्यात अधिक समन्वय वाढवून परिसरात शांतता आणि सुरक्षितता राखण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.
या बैठकीत कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी धमकावणे, दबाव टाकणे किंवा खंडणीसदृश प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला. औद्योगिक क्षेत्रात कोणत्याही प्रकारची दादागिरी, धमकी, जबरदस्ती किंवा बेकायदेशीर दबाव खपवून घेतला जाणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.
तसेच कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांची छेडछाड, विनयभंग किंवा कामाच्या ठिकाणी होणारे गैरवर्तन अशा प्रकारांवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. कंपनी व्यवस्थापनानेही महिला सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
सायबर गुन्हे प्रतिबंधाबाबतही बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. औद्योगिक कंपन्यांनी डिजिटल व्यवहार, ई-मेल, बँक व्यवहार, फसवे कॉल, बनावट ओळख आणि ऑनलाईन फसवणूक याबाबत सतर्क राहावे, तसेच संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
याशिवाय कंपन्यांमध्ये कामावर घेतल्या जाणाऱ्या कामगारांची चारित्र्य पडताळणी, बाहेरील व्यक्तींची नोंद, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक समस्या, पार्किंग, कॉन्ट्रॅक्ट वाद तसेच कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न यावरही सविस्तर चर्चा झाली. औद्योगिक परिसरातील वातावरण सुरक्षित आणि शांत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, कंपनी व्यवस्थापन आणि उद्योग संघटना यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
बैठकीदरम्यान M.I.D.C परिसरातील विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि समस्या मांडल्या. त्या समस्या जाणून घेत पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
या बैठकीस रांजणगाव M.I.D.C पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील, सदस्य मेहराम, पोलीस हवालदार ब्रह्मा पोवार, रिया चे प्रतिनिधी तसेच M.I.D.C मधील विविध कंपन्यांचे एच. आर. मॅनेजर्स व प्रतिनिधी उपस्थित होते.
उपस्थित कंपनी प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्वागत करत, अशा समन्वय बैठका औद्योगिक परिसरातील सुरक्षा आणि शांततेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. रांजणगाव M.I.D.C परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, कोणत्याही बेकायदेशीर कृत्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश या बैठकीतून देण्यात आला.
अमरावती: अमरावती शहरात शनिवारी (४ जुलै) रात्री उशिरा लुडो खेळादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण…
पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील कथित पाईप चोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात…
पावसाळ्यात कपडे, शूज आणि वाहन तपासूनच वापरा; विंचू-सापांपासून सावध राहण्याचे आवाहन चंद्रपूर: पावसाळ्यात घरात विंचू,…
वातावरण बदल झाला की, लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. सर्दी खोकला होणं तर कॉमनच आहे.…
किडनी आणि यकृत (लिव्हर) हे शरीराच्या आत असणारे अवयव महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरातील अनावश्यक घटक…