महाराष्ट्र

पँटमध्ये लपलेल्या विंचवाचा 12 वर्षीय मुलाला दंश; डॉक्टरांच्या प्रयत्नांनी 72 तासांनंतर जीव वाचला

पावसाळ्यात कपडे, शूज आणि वाहन तपासूनच वापरा; विंचू-सापांपासून सावध राहण्याचे आवाहन 

चंद्रपूर: पावसाळ्यात घरात विंचू, साप आणि इतर किडे-किटक शिरण्याच्या घटना वाढत असतात. अशाच निष्काळजीपणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथे 12 वर्षीय मुलाला पँटमध्ये लपलेल्या विंचवाने दंश केल्याची धक्कादायक घटना घडली. डॉक्टरांच्या वेळीच केलेल्या उपचारांमुळे तब्बल 72 तासांच्या प्रयत्नांनंतर मुलाचा जीव वाचला.

अनुप ईश्वर ढोणे (वय 12) हा मुलगा घरात खुंटीला टांगलेली पँट घालत असताना त्यामध्ये लपून बसलेल्या विंचवाने त्याला दंश केला. विषाचा तीव्र परिणाम झाल्याने त्याचा रक्तदाब शून्यावर आला. सुरुवातीला कुटुंबीयांनी ग्रामीण पद्धतीने उपचार करण्याचा प्रयत्न केल्याने मुलाची प्रकृती अधिकच गंभीर झाली. त्यानंतर त्याला तातडीने चंद्रपूर येथील डॉ. आनंद बेंदले यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉ. बेंदले यांनी मुलावर अतिदक्षता विभागात तीन दिवस शर्थीचे उपचार केले. अखेर 72 तासांनंतर उपचारांना यश आले असून सध्या मुलाची प्रकृती स्थिर आहे आणि त्याच्या जीवाला कोणताही धोका नसल्याची माहिती मिळाली आहे.

विंचू दंश झाल्यास काय करावे?

घाबरून न जाता रुग्णाला शांत ठेवा.

दंश झालेली जागा साबण व स्वच्छ पाण्याने धुवा.

बर्फ कापडात गुंडाळून 10–15 मिनिटे शेक द्या.

अंगठी, घड्याळ किंवा घट्ट कपडे काढून टाका.

तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी जा.

जखम कापणे, विष चोखणे किंवा दंशाच्या वर दोरी बांधणे टाळा.

घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पावसाळ्यात कपडे, शूज, वाहन किंवा घरातील कोपरे तपासूनच वापरणे, तसेच विंचू किंवा साप दिसल्यास सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

8 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

1 दिवस ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

1 दिवस ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

1 दिवस ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

1 दिवस ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

1 दिवस ago