मुख्य बातम्या

शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे निधन…

शिरूर (तेजस फडके): शिरूर-हवेलीचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबूराव पाचर्णे (वय ७१) यांचे आज (गुरुवार) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शिरूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

शिरूर तालुक्याच्या राजकारणातील संघर्षशील नेतृत्व माजी आमदार बाबूराव पाचर्णे हे मागील बाबूराव पाचर्णे अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराने रुग्णशय्येवर पडून होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी कालच रुग्णालयात जाऊन बाबूराव पाचर्णे यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. तब्बल सहा विधानसभा निवडणुका पाचर्णे लढले. यशापयशाची तमा न बाळगता त्यांनी तालुक्याच्या राजकारणातील संघर्ष जिवंत ठेवला होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गुडबुकमधील राजकारणी म्हणून पाचर्णे यांचा लौकिक होता. जात, धर्म, गरीब-श्रीमंत अगदी राजकीय विचारधारा याच्यापलिकडे जाऊन माणसाला आपलेसे करणारे पाचर्णे यांचे नेतृत्व आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिले.

राजकारणावर प्रस्थापितांच्या अभेद्य गडाला सुरुंग लावून पाचर्णे यांनी तालुक्याच्या राजकारणात स्वतः स्थान निर्माण केले. तर्डोबाचीवाडी यासारख्या एका छोट्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबूराव पाचर्णे यांनी तालुक्याच्या राजकीय पटावर स्वतःची मोहोर उमटवताना सातत्याने संघर्षाचा रस्ता निवडला. गावचे सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, साखर कारखाना आमदारकी या सगळ्या ठिकाणी पाचर्णे यांनी स्वकर्तृत्वाने स्वतःचे स्थान निर्माण केले होते.

शिरूर तालुक्यातील विवाह सोहळा, दशक्रिया विधींना ते आवर्जुन उपस्थित राहात होते. सर्वसामान्य नागिरकांच्या मनात त्यांनी घर निर्माण केले होते. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. दरम्यान, बाबूराव पाचर्णे यांच्या पार्थीवावर आज सायंकाळी ४ वाजता शिवतारा कृषि पर्यटन तर्डोबाचीवाडी (शिरुर) येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

19 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

20 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago