dimbe dam
घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी…
सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर, आंबेगाव तालुक्याला वरदान ठरत असलेले हुतात्मा बाबू गेनू जलाशय अर्थात डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात मागील तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आज (गुरुवार) ९३ टक्के भरले आहे.
दक्षता म्हणून घोडनदी पात्रात आज दुपारी धरणातून २५२० पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याची माहिती डिंभे धरण शाखा अभियंता तानाजी चिखले यांनी दिली. तर घोडनदी काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन ही चिखले यांनी केले आहे.
दरम्यान, येथून पुढे पाऊसाचा जोर वाढल्यास डिंभे धरणातून घोड नदी पात्रात केव्हाही जादा पाणी सोडण्यात येईल. नदीकाठाच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी असे आवाहन ही पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान शिरूर तालुक्यातील कवठे येमाई, टाकळी हाजी, फाकटे, पिंपरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी नदीत असणाऱ्या विद्युत मोटारी व साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांकडून मिळत आहे.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…