मुख्य बातम्या

शिरुरमध्ये अजित पवार यांना धक्का! पाहा कुठे फिरली निवडणूक…

शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदार संघ हा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना थेट आव्हान दिल्यानंतर निवडणूक प्रतिष्ठेची झाली. मतदारसंघातील निकालाचे आकडे आज समोर येत असून यामध्ये अभिनेता नेत्यावर वरचढ ठरत असल्याचे दिसत आहे. शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी ५० हजारहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना संधी दिली. मतदार संघात फिरले नसल्याचा आरोप करत अमोल कोल्हे यांना दुसऱ्यांदा खासदार होऊ न देण्याचा चंग अजित पवार यांनी बांधला होता. शिवाय, अजित पवार यांच्यावर उमेदवार आयात करावा लागला. पण, हे मतदारांना पटलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना घड्याळाच्या चिन्हावर उतरविण्याची ‘वेळ’ अजित पवार यांच्यावर आली. मग सुरू झाली, ती आव्हान-प्रतिआव्हानांची लढाई. डॉ. अमोल कोल्हे यांनी सुरवातीला अजित पवार यांचे मग शिवाजीराव आढळराव यांचे आव्हान स्वीकारले.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घड्याळ हातात बांधल्यानंतर प्रचारादरम्यान गटबाजी सुरू झाली. आढळराव पाटील यांचे कट्टर समर्थकांनी पक्षातंर्गतामुळे प्रचारातून काही प्रमाणात माघार घेतली. कारण, प्रचार धुरा सांभाळणाऱ्या नको त्या कार्यकर्त्याला कारण नसताना मोठे करण्यापेक्षा प्रचार न करणे हे अनेकांनी पसंत केले. याचाच फायदा अमोल कोल्हे यांना होताना दिसत आहे.

दरम्यान, राज्यातील राजकारणाची घसरलेली पातळी. नेत्यांनी सोडलेली तत्व, निष्ठा आणि स्वाभिमान पाहून मतदारांचा राजकारण्यांवरील उडालेला विश्वास, सोबतचं शिरूर लोकसभेतील उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसाचा व्यत्यय, यामुळं मतदानाची टक्केवारी घसरली. शिरुर लोकसभा मतदार संघात 2019 ला 60.62 टक्के मतदान झाल होते. ते 2024 ला 54.16 पर्यंत खाली आले. म्हणजे थेट 6 टक्क्यांनी मतांची घसरण झाली होती. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची धडधड वाढली होती.

शिरूर लोकसभा निवडणूकीत अमोल कोल्हे यांची जोरदार मुसंडी; पाहा आकडेवारी…

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुरमध्ये ‘ह्याला आम्ही पाडणार, गद्दारांना गाडणार’ असा मजकुर टाकत आढळराव यांच्या विरोधात बॅनरबाजी

शिरूरमधील राजकारण तापलं! आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना फटकारलं…

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

3 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago