Adhalrao Patil Amol Kolhe

शिरूर लोकसभा निवडणूकीत अमोल कोल्हे विजयाच्या उंबरठ्यावर; पाहा मतं…

मुख्य बातम्या राजकीय

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे ): लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (मंगळवार) सकाळी सुरुवात झाली असून पहिले कल हाती येत आहेत. यामध्ये पहिल्या फेरीतील मतमोजणी झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतदान आणि त्यानंतर ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. तर त्यांच्या विरोधात असलेले अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळकर हे पिछाडीवर असून हा अजित पवार यांना धक्क मानला जात आहे.

पहिल्या फेरी अखेर अमोल कोल्हे यांना ६११६ मतांची आघाडी मिळाली असून महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.
दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हे हे ९५५३ मतांनी आघाडीवर आहेत.
चौथ्या फेरीअखेर अमोल कोल्हे १८६७४ मतांनी आघाडीवर आहेत.

पाचव्या फेरीअखेर अमोल कोल्हे २५,०८८ मतांनी आघाडीवर
सहाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे २७०३३मतांनी आघाडीवर
सातव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ३३१९४ मतांनी आघाडीवर
नवव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ४४०६८ मतांनी आघाडीवर
दहाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ४९,७७० मतांनी आघाडीवर
अकराव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ५३,९४९ मतांनी आघाडीवर
बाराव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ५२,५४२ मतांनी आघाडीवर
चौदाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ६५,०२५ मतांनी आघाडीवर
पंधराव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ७२,५२५ मतांनी आघाडीवर
सोळाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ७१,९८२ मतांनी आघाडीवर
सतराव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ७६,५८३ मतांनी आघाडीवर
आठराव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ८३,०९३ मतांनी आघाडीवर
एकोनिसाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे ९२,६४९ मतांनी आघाडीवर
विसाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे १,०४८७५ मतांनी आघाडीवर
एकविसाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे १,१४,८५५ मतांनी आघाडीवर
बावीसाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे १,२०१९४ मतांनी आघाडीवर
तेवीसाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे १,२६,६५८ मतांनी आघाडीवर
चोवीसाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे १,३३,७६७ मतांनी आघाडीवर

सविसाव्या फेरी अखेर…
शिवाजीराव आढळराव पाटील यांना 551046 मते
तर अमोल कोल्हे यांना 688482 मते
अमोल कोल्हे 137436 मतांनी आघाडीवर

सताविसाव्या फेरी अखेर…
शिवाजीराव आढळराव पाटील यांना 554773 मते
तर अमोल कोल्हे यांना 693859 मते
अमोल कोल्हे 139116 मतांनी आघाडीवर

अंतिम फेरीत…
शिवाजीराव आढळराव पाटील यांना 557489 मते
तर अमोल कोल्हे यांना मते 698307
अमोल कोल्हे 1408118 मतांनी आघाडीवर

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाचे तालुका अध्यक्ष रविबापु काळे यांच्या निमोणे गावामधूनच अमोल कोल्हे यांच्या तुतारीला 581 मतांची आघाडी मिळाली आहे.

दरम्यान, अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा खासदार होणार की शिवाजीराव आढळराव खासदारकीचा चौकार मारणार? यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघात 2019 ला 60.62 टक्के मतदान झाले होते. ते 2024 ला 54.16 पर्यंत खाली आले. म्हणजे थेट 6 टक्क्यांनी मतांची घसरण झाली. आता या ना त्या कारणाने मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या मतदारांचा फटका कोणाला बसणार यावरून चर्चांना उधाण आले आहे.

मतदानाचा टक्का घसरला की चिंता ही सत्ताधाऱ्यांची वाढते, असा आजवरचा अनेकांचा अभ्यास सांगतो. मागच्या वेळी कोल्हे यांना निवडून आणणारी मंडळी यावेळी आढळराव यांचा प्रचार करत होती तर आढळरावांची ताकत असलेले पारंपारिक शिवसैनिक मात्र कोल्हे यांच्या बाजूने होते. त्यातच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील अपघातामुळे मतदार संघात फिरले नाही. त्याचाही कोल्हे ना फायदा होईल. देशात आणि राज्यात असलेली मोदी विरोधी लाट यामुळे अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा शिरूर लोकसभेचा घाट गाजवतील आणि दिल्लीत तुतारी फुंकतील, असे बहुतांश राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

शिरुरमध्ये अजित पवार यांना धक्का! पाहा कुठे फिरली निवडणूक…

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुरमध्ये ‘ह्याला आम्ही पाडणार, गद्दारांना गाडणार’ असा मजकुर टाकत आढळराव यांच्या विरोधात बॅनरबाजी

शिरूरमधील राजकारण तापलं! आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना फटकारलं…

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे