मुख्य बातम्या

शिरुर पोलीस स्टेशनला सिंघम अधिकाऱ्यांची गरज…? गेल्या वर्षेभरात गुन्हेगारीचा आलेख उंचावला

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत दिवसेंदिवस गुन्ह्याचा आलेख उंचावत असुन शिरुर शहर तसेच ग्रामीण हद्दीत मोठया प्रमाणात गुन्हे घडत आहेत. शिरुर शहरातुन चारचाकी गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असुन एका पोलिस कर्मचाऱ्याची गाडी चोरीला गेल्याने सर्वसामान्य जनतेचा पोलिस प्रशासनावरचा विश्वास उडत चालला असुन पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच थेट प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशनला ‘सिंघम’ अधिकाऱ्याची गरज असल्याची चर्चा सगळीकडे दबक्या आवाजात सुरु आहे.

 

शिरुर पोलिस स्टेशनची हद्द पुर्वला तांदळी ते पश्चिमेकडे काठापुर खुर्द एवढी असुन शिरुर पोलिस स्टेशन अंतर्गत टाकळी हाजी, न्हावरे, मांडवगण फराटा या ठिकाणी औट पोस्ट आहेत. परंतु शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठया प्रमाणात गुन्हेगारी वाढली असुन गेल्या अनेक दिवसांपासुन अनेक गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. तसेच खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात अंतर्गत मतभेद असल्याने त्याचा थेट परीणाम कामावर होत असल्याची चर्चा आहे.

वसुली बहाद्दरांमुळे गुन्हेगारीला मिळतेय बळ…?

शिरुर शहरातील ‘दहा इलेव्हन कॅफे’ मध्ये साध्या वेशात जाऊन कॅफेत चाललेल्या गैरप्रकाराबाबत पोलिसांनी कारवाई केली. शिरुर शहरात अजुनही अनेक ठिकाणी असे गैरप्रकार चालु असुन त्याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. शिरुर शहरात मोठया प्रमाणात गुटका, मटका, गावठी दारुची विक्री चालते. परंतु पोलिस स्टेशन मधील वसुली बहाद्दरांमुळे यावर कारवाई होत नसल्याचीही दबक्या आवाजात शिरुर शहरात चर्चा सुरु आहे.

 

साहेबांच्या मर्जीत न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बंदोबस्त…?

शिरुर पोलिस स्टेशनला काही वसुली बहाद्दर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे त्यांना कधीच कुठल्याच बंदोबस्तासाठी पाठवलं जात नाही. परंतु साहेबांची मर्जी न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र जाणीवपूर्वक कायमच कोणत्या ना कोणत्या बंदोबस्तासाठी पाठवलं जात असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राहिलेला नसल्याचीही चर्चा रंगत आहे.

 

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत प्रभावीपणे रात्रगस्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. तसेच याकरिता प्रत्येक गावातील ग्रामसुरक्षा दलाची मदत घेण्याचे नियोजन केलेले आहे.

प्रशांत ढोले (DYSP)

उपविभागीय अधिकारी, शिरुर 

शिरुर मधुन घरासमोर पार्क केलेली हुंडाई क्रेटा गाडी चोरट्याने नेली चोरुन, महीनाभरातील तिसरी घटना

रामलिंग महिला उन्नती व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांनी आमदार पवार यांचा वाढदिवस साजरा

दुर्दैवी; शिरुर तालुक्यातील निमोणे गावात साप चावल्याने दोन वर्षाच्या मुलीचा उपचारापुर्वी मृत्यू

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

5 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago