मुख्य बातम्या

शिरुर मधुन घरासमोर पार्क केलेली हुंडाई क्रेटा गाडी चोरट्याने नेली चोरुन, महीनाभरातील तिसरी घटना

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील स्टेट बॅक कॉलनी येथे घरासमोर पार्क केलेली ६ लाख रुपये किमंतीची पांढरा रंगाची हुंडाई क्रेटा गाडी अज्ञात चोरट्यांने चोरुन नेली आहे. शिरुर शहरात चारचाकी चोरण्याचे सत्र सुरुच असुन एका पोलिसाची हि चारचाकी गाडी चोरीला गेल्याने शहरात खळबळ माजली आहे.

 

याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित पोपट कुरंदळे (वय ३०) यांची चारचाकी गाडी दि २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ११:३० ते दि २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३०च्या दरम्यान स्टेट बॅक कॉलनी येथील घरासमोर रोडवर पार्क केलेल्या ठिकाणवरुन सहा लाख रु किंमतीची पांढऱ्या रंगाची चारचाकी हुंडाई क्रेटा क्रं एम एच १२ एम एल ३७०० हि गाडी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. या प्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक टेंगले हे करीत आहेत.

 

वरीष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मतभेत…?

रांजणगाव, शिक्रापुर येथुन बदलीने काही कर्मचारी शिरूर पोलीस स्टेशनला आलेले आहे . तेथे या कर्मचाऱ्यांनी अतिशय क्लिष्ट गुन्ह्यांचा, चोऱ्यांचा तपास लावला आहे. अनेक गुन्हे त्यांनी उघडकीस आणले आहे . शिरूर येथे आल्यानंतर मतभेदामुळे वरिष्ठांच्या चुकीच्या वागणुकीमुळे त्यांच्यात नाराजी असल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा शिरूर मधील नागरिक करत आहे.

दुर्दैवी; शिरुर तालुक्यातील निमोणे गावात साप चावल्याने दोन वर्षाच्या मुलीचा उपचारापुर्वी मृत्यू

रामलिंग महिला उन्नती व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांनी आमदार पवार यांचा वाढदिवस साजरा

संतापजनक ; सात म्हशींची एकाच गाडीतुन कृरपणे वागणुक देऊन वाहतूक केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

6 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago