शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिसांनी पुन्हा एकदा अवैध दारु व्यावसायिकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बुधवार (दि ८) रोजी शिरुर पोलिसांनी गावठी हातभट्टी दारुवर मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे.
पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार सुद्रिक, कळमकर आणि भवर यांनी कवठे येमाई, पिंपरखेड, जांबुत व आमदाबाद या गावांमध्ये एकाच वेळी ४ ठिकाणी छापे टाकुन गावठी हातभट्टी तसेच देशी-विदेशी दारुचा साठा उध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी एकुण १ लाख २३ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट केला.
तसेच अवैध दारु निर्मिती आणि साठा प्रकरणी खालील आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१) सागर गणपत गडगुळ (रा. कवठे येमाई, शिरुर)
२) संदीप निवृत्ती मुंजाळ (रा. कवठे येमाई, शिरुर)
३) भाऊसाहेब सावळेराम भोर (रा. पिंपरखेड, शिरुर)
४) प्रविण कैलास सोनवणे (रा. जांबुत, शिरुर)
५) आंबादास सिताराम तिळमाम (रा. अकोला, जि. नागपुर)
हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या धडक मोहिमेमुळे शिरुर परिसरातील अवैध दारु व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली असुन सर्वसामान्य नागरिकांकडुन पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
“गावठी हातभट्टी, विना परवाना देशी-विदेशी दारू विक्री किंवा साठा करणाऱ्यांविरुद्ध शिरूर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करत राहील. अशा अवैध धंद्यांमध्ये सहभागी व्यक्तींनी तातडीने आपले बेकायदेशीर व्यवसाय थांबवावेत, अन्यथा त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई करण्यात येईल.”
संदेश केंजळे
पोलिस निरीक्षक, शिरुर
शिरुर; कारेगाव येथील यश इन चौक बनत चाललाय अवैध धंद्यांचा अड्डा…?
शिरुर तालुक्यात घरात शिरुन महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल
रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…