शिरूर तालुका

शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर

शिरूर (अरुणकुमार मोटे): दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.०० या वेळेत शिरूर नगरपरिषदेच्या रसिकलाल धारिवाल सभागृहात प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या वेळी प्रांताधिकारी पुनम अहिरे, मुख्याधिकारी प्रीतम पाटील, कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ, तसेच पंकज काकड, चंद्रकांत पठारे, विनोद उबाळे आदी अधिकारी उपस्थित होते.

शिरूर नगरपरिषदेतील नगरसेवकांची संख्या यावेळी २१ वरून २४ इतकी वाढली असून, तीन नवीन नगरसेवक पदांची वाढ करण्यात आली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार शिरूर शहराची एकूण लोकसंख्या ३७,३११ असून त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,६१३, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १,००८ इतकी आहे.

नवीन आरक्षणानुसार एकूण १२ प्रभागांमधून प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून येणार असून, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे.

प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे

प्रभाग क्र. १: कामाठीपुरा, कैकाडी आळी, साळुंखे आळी, रम्यनगरी, प्रोफेसर कॉलनी, ढोर आळी, कुंभार आळी, मुंबई बाजार — सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण

प्रभाग क्र. २: कुंभार आळी, कुरेशी मोहल्ला, मदारी वस्ती, इस्लामपूरा, हल्दी मोहल्ला, बुरुड आळी, मुंबई बाजार

ओबीसी महिला, सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३: सोनार आळी, मारूती आळी, अष्टविनायक सोसायटी, खांडरे आळी, भाजी बाजार, फकीर मोहल्ला, लाटे आळी, सुभाष चौक, हलवाई चौक

ओबीसी, सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ४: सरदार पेठ, मारुती आळी, चर्च, आंबेडकर नगर, सुशीला पार्क, खारा मळा, पाचारणे मळा, सूरज नगर

अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ५: महादेव नगर, जोशीवाडी, विठ्ठल नगर, पोलीस लाईन, स्टेट बँक कॉलनी

सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण

प्रभाग क्र. ६: गणेश नगर, गुजर कॉलनी, बागवान नगर, स्टेट बँक कॉलनी

ओबीसी महिला, सर्वसाधारण

प्रभाग क्र. ७: यशवंत कॉलनी, रयत शाळा सैनिक सोसायटी, जिजामाता सोसायटी, शिवाजी सोसायटी, रेव्हन्यू कॉलनी, करंजुळे वस्ती

ओबीसी, सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ८: डंबेनाला, आडत बाजार, कापड बाजार, राम आळी, मारुती आळी, सरदार पेठ, रेव्हन्यू कॉलनी, शांती नगर

ओबीसी महिला, सर्वसाधारण

प्रभाग क्र. ९: साई नगर, काची आळी, सय्यदबाबा नगर, संजय नगर, सिद्धार्थ नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती

अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. १०: नवीन मार्केट यार्ड, वाडा वसाहत, गोपाळ वस्ती, छत्रपती कॉलनी, इंदिरा नगर, बीसी सोसायटी, इसवे नगर, पाबळ फाटा

अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण

प्रभाग क्र. ११: कामाठीपुरा, एस.टी. कॉलनी, प्रीतमप्रकाश नगर, पवार मळा, मंगलमूर्ती नगर

अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण

प्रभाग क्र. १२: हुडको कॉलनी, बोरा कॉलेज, बाफना मळा, दिघे मळा

ओबीसी, सर्वसाधारण महिला

या सोडतीनंतर आगामी निवडणुकीसाठी शिरूरमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

17 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

17 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

21 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

22 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

22 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

22 तास ago