शिरुर तालुक्यात घरात शिरुन महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात विवाहित महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी खंडू सोनबा जाधव या इसमाविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका २९ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ च्या सुमारास ‘ती’ आपल्या घरात स्वयंपाक करत असताना आरोपी जाधव हा घरात आला. “तुझा नवरा कुठे गेला…?” असा प्रश्न विचारत त्याने फिर्यादीचा हात पकडत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी महिलेने आरडाओरडा केल्यावर तिची नातेवाईक असलेली महिला घटनास्थळी धावली. त्यावेळी आरोपीने शिवीगाळ करत तेथून पळ काढला. या घटनेची माहिती फिर्यादीने आपल्या पतीस दिली व त्यानंतर शिरुर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

या प्रकारामुळे ‘त्या’ गावात संतापाची लाट पसरली असून नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार गणेश पालवे हे करत आहेत.

शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून युवकाची क्रूरपणे हत्या; आरोपी गजाआड

रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक