मुख्य बातम्या

शिरुर; रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टला ‘ब’ वर्ग दर्जा; फटाके वाजवत आनंदोत्सव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरुर तालुक्यातील ‘श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट’ ला शासनाच्या ग्रामविकास खात्याकडुन अखेर ‘ब वर्ग देवस्थान’ असा दर्जा प्राप्त झाल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली. या निर्णयामुळे देवस्थानच्या विकास, व्यवस्थापन व पारदर्शक कारभाराला नवी दिशा मिळणार आहे. तसेच शिरुर तालुक्यासाठी हि एक अभिमानाची बाब ठरली आहे.

श्री क्षेत्र रांजणगाव हे अष्टविनायकांपैकी एक प्रमुख गणपती स्थान असून, येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणाला अनेक दिवसांपासुन ‘ब’ वर्ग दर्जा मिळावा अशी मागणी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओंकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव यांनी केली होती. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आवश्यक ‘त्या’ प्रक्रिया पुर्ण करुन हा निर्णय घेतला आहे.

या मान्यतेमुळे ट्रस्टला आता शासनाच्या विविध योजना, अनुदाने, तसेच धार्मिक पर्यटन विकास प्रकल्पांमधून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच ट्रस्टचा कारभार अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि नोंदणीकृत नियमांनुसार होणार आहे.

रांजणगाव देवस्थान ट्रस्ट देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओंकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव यांच्यासह रांजणगावच्या स्थानिक ग्रामस्थ तसेच शिरुर तालुक्यातील भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. रांजणगाव ग्रामस्थांनी देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याबद्दल फटाके वाजवत आनंद व्यक्त केला आहे.

रांजणगाव देवस्थान ट्रस्ट देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार राहुल कुल यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

7 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago