महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर ते पुणे नव्या महामार्गाचा मॅप व्हायरल…

शिरूर : छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नव्या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधीच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे महामार्ग ज्या भागातून जात आहे त्या भागातील जमीन खरेदी करण्यासाठी पुणे मुंबईतील व्यावसायिक आणि शहरातील बड्या श्रीमंतांची लगबग सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांना आपल्या शेतातून महामार्ग जात असल्याची कसलीच माहिती नाही. तर आपल्या शेतीला काही पट भाव मिळत असल्याने या भागात रोज अनेक व्यवहार होत असल्याची माहिती समोर आली आहे. नकाशा तयार करण्याची जबाबदारी कोणाची? कुठल्याही महामार्गाचा नकाशा तयार करायचा असेल त्यासाठी एक एजन्सी नेमली जाते. त्यामुळे सहाजिकच हा नकाशा एजन्सीकडे असतो. नकाशा तयार झाल्यानंतर तो सदरील विभागाकडे दिला जातो. त्यामुळे नॅशनल हायवे विभागाकडे हा नकाशा जातो. एमएसआयडीसी या विभागाकडे देखील नकाशा जमा केला जातो.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नव्या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करण्याकडे व्यावसायिकांचा कल वाढला आहे. पण, शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत, असेही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…

पुणे-शिरूर महामार्ग खरंच होणार कोंडीमुक्त; तीन मजली उड्डाणपुलाचे काम मार्चपासून…

पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी फुटणार; दुमजली उड्डाणपूलासह…

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे

पुणे-नगर महामार्गावरील ५६ किमी उड्डाणपुलाचा मार्गामध्ये पुन्हा बदल…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

5 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

14 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago