santosh shelar
अपघातात सादलगाव येथील तरुणाचा मृत्यू
मांडवगण फराटा (संपत कारकूड): वडगाव रासाई-मांडवगण फराटा रस्त्यावरील कोळपे वस्तीजवळ रविवारी (ता. १७) रात्री ८ च्या सुमारास झालेल्या अपघातात संतोष भरत शेलार (वय २४, सादलगाव, गणपती माळ) या युवकाचा मृत्यू झाला आहे.
संतोष शेलार यांचा गेल्या १२ वर्षांपासून दुधाचा व्यवसाय आहे. ते नेहमीप्रमाणे मांडवगण फराटा येथील डेअरीत मोटारसायकलवरून दूध घालण्यासाठी रात्री ८ वाजता मित्राबरोबर घरातून बाहेर पडला होते. मांडवगण फराटाकडे जात असताना कोळपे वस्ती येथे रस्त्यावर मोकळी ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती. समोरून वाहन आल्याने त्याला जाऊ देण्यासाठी गाडी बाजूला घेण्याच्या प्रयत्नात उभ्या असलेल्या मोकळ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक बसली. यावेळी शेलार यांच्या गळ्याला लोखंडाचा मार लागला. उपचारासाठी तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, वर्मी मार लागल्यामुळे उपचारापुर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
संतोष शेलार हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. गेली १२ वर्षांपासून तो दूध व्यवसायात होता. हाताखाली मदतीला आलेला मुलगा गमविल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आजूबाजूला सर्व गावांमध्ये या घटनेची हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेले रस्त्यावरील मोकळ्या ट्रॉलीबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे संतोष शेलार यांच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला असून अपघात कसा झाला? याची मांडवगण फराटा येथील पोलिस श्री. जगताप व श्री. साबळे कसून चौकशी करीत आहेत.
इंदूरहून महाराष्ट्राकडे येणारी एसटी नदीत कोसळली; १३ जणांचा मृत्यू…
नवी दिल्ली: शेण आणि इतर जैविक कचऱ्यापासून आता शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांना मोठे उत्पन्न मिळवण्याची…
15-16 ऑगस्टला जिल्हाध्यक्षांची बैठक; लवकरच नव्या प्रवक्त्यांसह संघटनात्मक फेरबदलांची घोषणा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र…
जात प्रमाणपत्र रद्द, मराठा आरक्षण आणि गद्दारीच्या आरोपांवरून शिंदे-जरांगे आमनेसामने; निवडणुकीत आमदार पाडण्याचा जरांगेंचा इशारा…
चार लोकप्रतिनिधींची अंतरवाली सराटीत जरांगे यांची भेट; एकनाथ शिंदेंवर 'डबल ढोलकी' वाजवण्याचा आरोप, बावनकुळे यांच्यावरही…
सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात शिंदे गटाचा युक्तिवाद; ६० आमदारांच्या जनादेशाचा शिंदेंनी केला उल्लेख मुंबई: शिवसेना पक्ष,…
मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक आणि 'डोह'कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी (श्री.वि.) यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार…