मुख्य बातम्या

Video: शिरूर तालुक्यातील चौघांना लोणावळा पोलिसांनी केली अटक…

पुणे : पुणे ग्रामीण पोलिस दलाने दमदार कामगिरी केली असून, कामशेत पोलिसांनी ५६ लाख, ९२ हजार किंमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी शिरूर तालुक्यातील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील यांना २२/०८/२०२४ रोजी सकाळी त्यांचे गोपनीय बातमी दारामार्फत ताजे (ता. मावळ) गावचे हददीतून जुने हायवेरोडकडून ताजे गावाकडे जाणारे रोडमार्गे मळवली, लोणावळाकडे ४ जण त्यांचे ताब्येतील सिल्हवर रंगाचे वेरना कारमधुन गांजांची वाहतुक करणार असलेची माहिती मिळाली होती. त्यांनी वरीष्ठांना मिळाले बातमीचा आशय सांगून उपविभागीय पोलिस अधिकारी, लोणावळा विभाग यांचे मार्गदर्शना प्रमाणे दोन पथके तयार करून पंचांचे उपस्थितीमध्ये सापळा लावला. त्यानंतर मिळाले बातमीप्रमाणे एक वेरना कार नंबर एम.एच/१४/ जी. वाय / ०५५० हि जुने हायवे रोडणे ताजे गावाकडे आलेली दिसली. त्यावेळी सापळा कारवाईसाठी तयार पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निरीक्षक रविंद्र पाटील यांनी दिले सुचने प्रमाणे छापा घालून कारची व डिकीची पाहणी केली असता डिकीमध्ये एकूण ९८ किलो वजनाचा गांजा हा आंमलीपदार्थ मिळून आला.

सदर कार मधील
१) अभिषेक अनिल नागवडे, वय २४,
२) प्रदिप नारायण नामदास, वय २५ वर्षे,
३) योगेश रमेशलगड, वय ३२ वर्षे,
४) वैभव संजीवण्न चेडे, वय २३ वर्षे, (सर्व रा. पी.एम.टी. जवळील, मराठी शाळे जवळ, कारेगाव, ता. शिरूर जि. पुणे) यांना गांजा बाळगले बददल ताब्यात घेवून छाप्यामध्ये मिळुन आलेला एकुण ९८ किलो वजनांचा गांजा एकूण ४८ लाख ५० हजार रूपये किंमतीचा गांजा तसेच ८ लाख रूपये किंमतीची वेरना कार, ४२ हजार रूपये किंमतीचे ३ मोबाईल हॅडसेट असे एकूण ५६ लाख ९२ हजार रूपये किंमतीचा मुददेमाल मिळून आला असून, तो पंचा समक्ष जप्त केला आहे. त्यावरून सदर इसमांवर कामशेत पोलिस स्टेशनला गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८ (क) २० (क) अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधिक्षक, रमेश चोपडे, सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील, तसेच पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा फौजदार नितेश कदम, पोलिस अंमलदर. रविंद्र रावळ, जितेंद्र दिक्षित, समिर करे, रविंद्र राय, गणेश तावरे, प्रतिक काळे, गणेश ठाकुर, शिवाजी टकले, सचिन निंबाळकर, पवन डोईफोडे, होमगार्ड सुशिल लोखंडे, रामदास पोटफोडे यांनी कारवाई केली.

चिंचणी येथील वाळूमाफीयांविरोधात जोरदार कारवाई करणार; तहसिलदार बाळासाहेब म्हस्के

शिरुर येथील ‘सेंट जोसेफ’ शाळेत डिजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत डान्स करणे शिक्षकांना भोवले; तब्बल १७ जणांवर गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी-परीटवाटी रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू…

मंगलदास बांदल यांच्या पत्नी आणि भावालाही ईडीने चौकशीला बोलावलं; ईडीच्या कोठडीत अजुन आठ दिवस बांदलाचा मुक्काम

Video; पुणे-नगर रस्त्यावर फलके मळा येथे दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

14 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago