मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील भुमाफिया बंटी-बबलीचा कारनामा; दोन उद्योजकांना घातला करोडोंचा गंडा…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील गट क्रं ४२१ मधील भोगवटा वर्ग २ ची इनाम वतन ६ ब ची जमीन आधी पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकास विकली नंतर त्याच जमीनीचे पुन्हा बेकायदेशीर कुलमुखत्यारपत्र बनवत पुन्हा त्याची विक्री केल्याप्रकरणी बनावट कुलमुखत्यार धारक दिपक राजकुमार पंचमुख याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता दिपक पंचमुख याची पत्नी रविता पंचमुख हिने रांजणगाव गणपती येथील गट क्रं १०२५, १०३८ तसेच १०४० मधील भोगवटा वर्ग २ ची इनाम वतन ६ ब ची जमीन बनावट कुलमुखत्यारपत्र बनवत दुसऱ्या व्यक्तीस विकली असल्याने रांजणगाव येथील उदयोजकाने या भुमाफिया बंटी बबली पती-पत्नीसह एकुण १४ जणांवर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

रांजणगाव गणपती येथील हॉटेल व्यावसायिक संदीप सुदाम कुटे (वय ४२) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार दिपक राजकुमार पंचमुख तसेच रविता दिपक पंचमुख यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१८ साली रांजणगाव गणपती गावच्या हद्दीतील जमीन गट नं १०२५ मधील १ हेक्टर ५१ आर पैकी ०० हेक्टर ७५. ५ आर आणि जमीन गट नं १०३८ मधील ०० हेक्टर ५७ आर पैकी ०० हेक्टर २८.५ आर तसेच जमीन गट नं १०४० मधील ०० हेक्टर ५२ आर पोट खराबा ०. ०६ पैकी ०० हेक्टर ३४ आर शेतजमीन विक्रीसाठी काढल्याची माहिती संदीप कुटे यांना मिळाली होती. सदरच्या मिळकती कुटे यांच्या इतर मिळकतीच्या लगतच असल्यामुळे कुटे यांची या जमिनी विकत घेण्याची इच्छा होती. त्यामुळे दिपक राजकुमार पंचमुख (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्या मध्यस्तीने सदर जमिनीचे मुळ मालक १) भिमराव सारंग रोकडे, २) सुनिता भिमराव रोकडे, ३) सागर भिमराव रोकडे, ४) निशा भिमराव रोकडे, (रा. चर्चगेट, मुंबई) ५) सविता वसंत राजगुरु, ६) मयुर वसंत राजगुरु, दोघेही (रा. चेंबूर, मुंबई), ७) सुभाष सारंग रोकडे, ८) मंगल सुभाष रोकडे, ९) प्रशांत सुभाष रोकडे, १०) राकेश सुभाष रोकडे, ११) स्वप्निल सुभाष रोकडे (रा. सी जी एस कॉलनी, सेक्टर ६ मुंबई) यांच्याशी चर्चा करुन सदर जमिनीमध्ये असणारा त्यांच्या जमिनीचा हिस्सा विकत घेण्याचे ठरवले.

सदर जमीन मिळकती या भोगवटा वर्ग २ ची इनाम वतन ६ ब असल्याने तसेच सदरची जमीन हि पुर्वी बांधकाम व्यावसायिक प्रभाकर पांडुरंग भोसले (रा. धानोरी, पुणे) यांनी वरील सर्व मुळ मालकांकडुन साठेखत व कुलमुखत्यार करुन घेतली होती. सदर जमीन विकत घेताना जिल्हाधिकारी पुणे यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक असल्याने कुटे यांनी सदर जमिनीचे मुळ मालक व प्रभाकर भोसले यांच्याकडून तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात या जमिनीचे साठेखत व कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र २ फेब्रुवारी २०२२ रोजी संदीप कुटे आणि त्यांचे सहकारी नंदलाल टिळकचंद अगरवाल (रा. इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे) यांच्या नावे करण्यात आले होते. हि शेतजमीन विक्रीसाठी अटी व शर्तीवर अप्पर जिल्हाधिकारी यांनीही या जमिनीच्या विक्रीबाबत परवानगी दिली होती. परंतु, जमिनीच्या मुळ मालकांनी व्यवहार पुर्ण करुन देण्यास टाळाटाळ केली.

त्यानंतर १२ एप्रिल २०२१ रोजी दिपक राजकुमार पंचमुख यांची पत्नी रविता दिपक पंचमुख आणि संदीप कुटे यांच्यात वरील जमिनीबाबत विसारपावती व करारनामा (नोटरी) झाला होता. त्यावेळी दस्त बनविताना विसारापोटी रोख १ लाख रुपये पंचमुख यांनी कुटे यांना दिले होते. परंतु त्यानंतर रविता पंचमुख यांनी सदर विसार पावती व करारनाम्यात कबुल केलेली रक्कम आजपर्यंत संदीप कुटे यांना दिलेली नाही.

त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये रविता दिपक पंचमुख यांनी सदर जमिनीचे मुळ मालक यांच्याकडुन पुन्हा शिरुर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात तिसऱ्यांदा कुळ मुखत्यारपत्र करुन घेतले. हि बाबत संदीप कुटे यांना कळाल्यानंतर त्यांनी दिपक पंचमुख यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी या जमिनीचे मुळ मालक भिमराव सारंग रोकडे यांच्याशीही याबाबत संपर्क साधला असता त्यांनीही कुटे यांना उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली. त्यानंतर दि २२ जानेवारी २०२४ रोजी जमीन गट नं १०४० मधील ०० हेक्टर ५२ आर पोट खराबा ०. ०६ पैकी ०० हेक्टर ३४ आर या शेतजमिनीचे मुळ मालक आणि कुलमुखत्यार धारक रविता पंचमुख यांनी विशाल जिजाभाऊ पवळे (रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांना शिरुर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात १६ लाख रुपये मोबदला घेऊन साठेखत करुन दिल्याची माहिती संदीप कुटे यांना कळाल्याने त्यांनी याबाबत पुन्हा दिपक पंचमुख आणि भिमराव रोकडे यांना फोन करुन विचारणा केली असता. त्या दोघांनीही कुटे यांना उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली.

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे संदीप कुटे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला धाव घेत दिपक राजकुमार पंचमुख व रविता दिपक पंचमुख या दोन पती-पत्नीसह भिमराव सारंग रोकडे, सुभाष सारंग रोकडे, सविता वसंत राजगुरु, सुनिता भिमराव रोकडे, सागर भिमराव रोकडे, स्वाती सचिन गायकवाड, निशा भिमराव रोकडे लग्नानंतरचे नाव निशा अभिषेक सपकाळ, मंगल सुभाष रोकडे, स्वप्निल सुभाष रोकडे, प्रशांत सुभाष रोकडे, राकेश सुभाष रोकडे, मयुर वसंत राजगुरु या १२ जणांविरुद्ध रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण हे करत आहेत.

(क्रमशः) 

रांजणगाव गणपती येथे एकाच जमिनीची दोनदा विक्री; दिपक पंचमुख यांच्यासह ११ जणांवर गुन्हे दाखल

शिरूर! अल्पवयीन मुलांचे अपहरण अन् मुलीचा खून करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

जि. प.माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांचा अखेर जामीन मंजूर…

कौतुकास्पद; शिरुर पोलिसांची दारुवर मोठी कारवाई दारुसह ७५ लाखांचा ऐवज केला जप्त 

रांजणगाव MIDC त कामगारांना खोलीत डांबुन ठेवत मारहाण चार जणांविरोधात गुन्हा दाखल; दोन अटकेत

पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहतीत ठेकेदारांकडुन फेकला जातोय कँटीनचा राडरोडा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळूमाफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

13 सेकंद ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

3 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

5 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago