मुख्य बातम्या

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह त्याला वाचवण्यासाठी आलेल्या तरुणालाही लाथाबुक्क्यांनी, दगड, फायटर, काठी आणि कोयत्याने मारहाण केल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी धनंजय साळुंखे, गोरख मोरे, मयूर कांबळे यांच्यासह सहा ते सात अनोळखी इसमांविरोधात रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य तुषार शितोळे (वय १९, रा. खेडकर वस्ती, रांजणगाव गणपती) याने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. (दि १८) सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास रांजणगाव गणपती हद्दीतील वामन वाईन्स परमिट रुमसमोर हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, यापुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन धनंजय साळुंखे, गोरख मोरे, मयूर कांबळे व सहा ते सात अनोळखी इसमांनी गर्दी जमवून त्याला हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच डोक्यात दगड व फायटरने मारहाण केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, आदित्य शितोळे याला वाचवण्यासाठी दादा खेडकर (वय २८) हा पुढे आला असता, त्याच्यावरही संबंधितांनी हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दादा खेडकर याला हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच कोयता, दगड आणि काठीने हात, पाय व डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके करीत आहेत. 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

4 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

9 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

3 दिवस ago