क्राईम

शिरूर! अल्पवयीन मुलांचे अपहरण अन् मुलीचा खून करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यापैकी एका 7 वर्षीय मुलीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

बबन रामफेर यादव (वय 44, रा. कोरेगाव भीमा, कल्याणी फाटा, ता. शिरूर जि.पुणे मुळ रा. अहिरावल दरखा, अमेठी, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गायत्री रंजित रविदास (वय 7) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीची आई बिनादेवी रंजित रविदास (वय 34, रा. आदित्य पार्क सोसायटी, कोरेगाव भीमा ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारीला फिर्यादी यांच्या 7 वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिस पथक शोध घेत असताना परिसरातील इतर दोन लहान मुले ही शिक्रापूर-चाकण रोडवरील बहुळ या गावाजवळ मिळून आली होती. त्याआधारे आणखी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यावेळी एक व्यक्ती अपहरण झालेली मुलगी गायत्री व बहुळ येथे मिळून आलेली दोन मुले यांना त्याच्याकडील मोटार सायकलवरून शिक्रापूर ते चाकण बाजूकडे जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले होते. सदर इसमाची ओळख पटवून तो फिर्यादी राहत असलेल्या परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता तिनही मुलांचे अपहरण केल्याची कबुली दिली. तसेच शिक्रापूर-चाकण रोडने घेवून जाताना रोडलगत असणारे विहीरीमध्ये गायत्री रविदास हिस टाकून देवून तिचा खून केला असल्याचे सांगितले. व इतर दोन मुलांना बहुळ येथे सोडून दिल्याची माहिती दिली. आरोपीचे मदतीने गायत्रीचा शोध घेतला असता, बहुळ गावाजवळील रोडलगत असणारे विहीरीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला होता. आरोपी बबन यादव हा सध्या न्यायालयीन कोठडी मध्ये असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदिप साळुंखे करीत आहेत.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, शिक्रापर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप साळुंखे रोहीणी सोनावळे, पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सोमनाथ कचरे, मस्कर, जितेंद्र पानसरे, पोलिस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, सागर धुमाळ, पोलिस अंमलदार विरण्णा मुत्तनवार, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, रोहीदास पारखे, विकास पाटील, जयराज देवकर, शिवाजी चितारे, यांनी केली असून पुढील तपास शिक्रापुर पोलिस स्टेशन करत आहे.

शिरूर तालुक्यात अनैतिक संबंधातून बालकांचे अपहरण; चिमुकलीला फेकले विहिरीत…

पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचार प्रकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल

धक्कादायक; ५ ते ६ जणांच्या टोळक्याकडुन तरुणाचे अपहरण करुन लोखंडी रॉडने बेदम मारहाण

शिरूर शहरातील अश्लील वर्तन करण्यास मुभा देणा-या त्या कॅफेवर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

शिरूर तालुक्यात घडली धक्कादायक घटना; युवक, युवतीला मारहाण करत केला सामूहिक बलात्कार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

17 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

17 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

18 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

18 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

23 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

23 तास ago