मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली गजाआड…

शिरुर: शिरूर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. आरोपींना न्यायालयाने ३ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी मंजुर सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इनामगाव (ता. शिरूर) नांद्रेमळा येथील कानिफनाथ मंदिरांच्या भिंतीच्या आडोश्याला पाच जण पहाटेच्या सुमारास संशयास्पद रित्या उभे असलेले काही जण रात्रगस्त घालत असलेल्या पोलिस पथकास दिसले. त्यांना पोलिसांनी तेथे थांबण्याचे कारण विचारले असता ते काही समाधानकारक माहिती देत नव्हते व उडवा उडवीची उत्तरे देत होते. त्यांचेकडे मिळून आलेल्या हत्यारे व साधनावरून सदरचे इसम हे कोठेतरी दरोडा घालण्याचे तयारीत असल्याची खात्री झाली असल्याने पोलिस शिपाई योगेश गुंड यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पोलिस ठाणे गु.र.नं ५४५ / २२ भा.द.वि.क. ३९९,४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच पैकी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी अंधाराचा फायदा घेउन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. किसन रामा लोखंडे, अशोक उर्फ सोनू बबन जाधव, ऋषीकेश बाळासो गरडकर, रवि रमेश नाईक अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे आहेत तर पंकज उदास काळे असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक खाकी रंगाची विना नंबर प्लेटची बुलेट, एक लोखंडी पहार, एक कुऱ्हाड, एक स्प्रे पेंन्ट, दोन मिरची पावडरच्या पुडया, एक रस्सी, एक पोको कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल हॅन्डसेट असा एकूण एक लाख एकावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चार आरोपींना अटक करून न्यायालयात हजार केले असता आरोपींना न्यायालयाने ३ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी मंजुर सुनावली आहे.

सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करत असून पोलिस तपासामध्ये अनेक गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत. आरोपी यांच्याकडे मिळून आलेली एक खाकी रंगाची विना नंबर प्लेटची बुलेट ही त्यांनी कासुर्डी टोलनाका येथून चोरलेली असून याच आरोपीनी १ ऑगस्ट रोजी रात्री दौंड तालुक्यातील राहू येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीमधील रवि रमेश नाईक हा यवत पोलिस ठाणे येथील सन २०२१ मधील एटीएम फोडीच्या प्रयत्न गुन्हयामधून आज पर्यंत फरारी होता. वरील आरोपीनी आणखी गुन्हे केल्याची शक्यता असून त्या दृष्टीने शिरूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

संबंधित कारवाई पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक मितेश गटटे सेवा पुणे व उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मागदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहाय्यक फौजदार राजेंद्र साबळे, पोलिस नाईक नितीन सुद्रिक, पोलिस शिपाई योगेश गुंड, होमगार्ड सुहास आडगळे, राहुल चौगुले, पोलिस मित्र अक्षय काळे यांच्या टिमने केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

2 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

5 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

7 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago