मुख्य बातम्या

Video: कारेगावच्या सरपंच मॅडमला पुन्हा डिवचलं…

शिरूर: कारेगावमध्ये (ता. शिरूर) पंचायत समिती निवडणुकीनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांच्या पराभवानंतर भाजपच्या विजयी उमेदवाराकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर नोटांची उधळण केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंचायत समिती कारेगाव गणातून भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांचा पराभव केला. अधिकृत आकडेवारीनुसार मनीषा पाचंगे यांना 6693 मते मिळाली, तर निर्मला नवले यांना 6500 मते मिळाली. म्हणजेच 193 मतांचा फरक राहिला. (याआधी 329 किंवा 393 मतांचा उल्लेख केला जात असला तरी अंतिम निकालानुसार फरक 193 मतांचा असल्याची माहिती स्थानिक स्तरावर सांगितली जात आहे.)

पराभवानंतर निर्मला नवले यांनी निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर पैसा, दारू आणि ड्रग्जचा वापर झाल्याचा आरोप केला होता. या वक्तव्यामुळे आधीच राजकीय वातावरण तापले होते. आता ग्रामपंचायत कार्यालयासमोर नोटांची उधळण केल्याचा व्हायरल व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे वादाला अधिकच खतपाणी मिळाले आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मोठी गर्दी दिसते. कार्यकर्त्यांच्या अंगावर गुलाल उधळलेला आहे. जल्लोष सुरू असताना कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ चलनी नोटा उधळल्या जात असल्याचे दृश्य दिसते. घोषणाबाजी सुरू असताना काही जण नोटा हवेत फेकताना दिसत आहेत. हा जल्लोष विजयी उमेदवार मनीषा पाचंगे यांच्या समर्थकांचा असल्याचा दावा करण्यात येतो आहे. तसेच उमेदवाराकडूनच पैसे उधळण्यात आल्याचा आरोपही काहींकडून केला जात आहे.

सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता असूनही पराभव पत्करावा लागल्याने निर्मला नवले यांच्याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. दुसरीकडे, भाजप समर्थकांनी विजयाचा उत्सव साजरा करताना कोणतीही बेकायदेशीर कृती केल्याचा आरोप फेटाळला असल्याची माहिती मिळते आहे. कारेगावमधील या घडामोडींमुळे शिरूर तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणी अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

‘पैसा-जिंकला, माणूस हरला’! ‘दारू-ड्रग्जचा वापर झाला’; पराभवानंतर निर्मला नवले यांचा गंभीर आरोप

शिरूर! कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पराभवाचा धक्का…

आमची लग्न व्हायची आहेत; मुठभर चुकीच्या लोकांसाठी शिरुरची बदनामी कशासाठी…?

शिरूर तालुक्यात निवडणूक जल्लोषानंतर शांतता अन् चर्चांना उधाण…

Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

17 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago