स्वच्छता आणि सुविधांबाबत दिले कडक निर्देश
मुंबई: गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शुक्रवारी सायंकाळी आकस्मिक पाहणी केली. या पाहणीदरम्यान महापौरांनी विविध विभागांना भेट देत रुग्णांशी थेट संवाद साधला आणि रुग्णालय प्रशासनाला तातडीच्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
महापौरांनी अपघात विभाग, महिला वैद्यकीय रुग्ण कक्ष, प्रसूती कक्ष, पुरुष वैद्यकीय रुग्ण कक्ष तसेच अतिदक्षता कक्षाची पाहणी केली. महिला रुग्ण कक्षात पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था आणि बालकांसाठी स्वतंत्र पाळणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच सर्व कक्षांची दैनंदिन स्वच्छता काटेकोरपणे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.
जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र वितरणाची कार्यपद्धती काय आहे, याचीही महापौरांनी सविस्तर माहिती घेतली. रुग्णांना सेवा देताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सुविधा अधिक कार्यक्षम करण्यावर भर देण्यात आला.यावेळी माध्यमिक आरोग्य सेवा प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवार उपस्थित होते. महापौरांच्या या आकस्मिक भेटीमुळे रुग्णालयातील सेवांबाबत प्रशासन अधिक सतर्क झाले असून लवकरच आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…