शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गावागावांत रात्रंदिवस प्रचार सुरू होता. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी जेवणाच्या पंगती, देवदर्शन यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बैठका घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे गावांमध्ये सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते.
View this post on Instagram
निवडणूक प्रचाराच्या काळात गावागावांत मोठा जल्लोष पाहायला मिळत होता. कार्यकर्त्यांची लगबग, प्रचारफेऱ्या, सभा आणि घोषणाबाजी यामुळे ग्रामीण भागातील वातावरण पूर्णपणे निवडणूकमय झाले होते. मात्र आता निकाल जाहीर झाल्यानंतर गावांमध्ये पुन्हा शांतता पसरलेली दिसत आहे. नागरिक आपापल्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त झाले असून, शेती-व्यवसाय आणि रोजगाराकडे लक्ष देताना दिसत आहेत.
दरम्यान, निवडणुकीचे निकाल आणि त्याचे राजकीय परिणाम यावर गावागावांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. कोणत्या उमेदवाराला अपेक्षित यश मिळाले, कोणाचे गणित चुकले आणि पुढील राजकीय समीकरणे कशी असतील याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.
View this post on Instagram
मतदानाच्या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आगामी यात्रा-जत्रा आणि गावातील सण मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार असल्याचेही बोलले जात आहे. एकूणच, निवडणुकीच्या गडबडीनंतर आता तालुक्यातील वातावरण शांत झाले असले तरी राजकीय चर्चा आणि सामाजिक हालचालींना वेग कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल…
‘पैसा-जिंकला, माणूस हरला’! ‘दारू-ड्रग्जचा वापर झाला’; पराभवानंतर निर्मला नवले यांचा गंभीर आरोप