मुख्य बातम्या

शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तब्बल १२९ रस्ते केले खुले…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा अडचणी समजून घेत या शेत रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत नवीन रस्ते, रस्ते खुले करणे, पानंद रस्ते, शिव रस्ते असे एकूण तब्बल १२९ रस्ते शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आजपर्यंत खुले केले आहेत. शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहे.

शिरुर तालुक्यातील बऱ्यापैकी लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. डिंभा धरण व चासकमान धरणामुळे शेतीला बारमाही पाणी मिळत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. त्यामुळे रस्त्यासाठी वाद होऊ लागले आहे. तसेच कृषी आणि तत्सम क्षेत्रात कमी होत चाललेल्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण हा शेती क्षेत्रासाठी एक अपरिहार्य मुद्दा बनला आहे.

आजच्या यांत्रिकीकरणांमध्ये शेतीमध्ये विविध कामे जसे कि, पेरणी, पाळी, नांगरणी, अंतरमशागत, कापणी, मळणी इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येत आहेत. शेतीमाल विक्रीसाठी बाजारात पोहचविण्याकरीता तसेच विविध यंत्रसामुग्री शेतीकामासाठी शेतीपर्यंत पोहचण्यासाठी शेतीला सर्वऋतूत व बारमाही शेत रस्त्यांची अत्यंत आवश्यकता असते. यामुळे शेतरस्ते, शिवरस्ते, पाणंद रस्ते व पाऊल रस्ते इत्यादी रस्ते प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता उपयोगात येत असतात. अनेक शेतकऱ्यांना शेतमाल बाहेर काढण्यासाठी शेजारील शेतकरी रस्ता देत नाही. किंवा रस्त्यावर अतिक्रमण केलेले असते. शेत रस्त्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये तक्रारी वाढत चालल्या असून, शेतमाल बाहेर काढण्यासाठी, पानंद रस्ते खुले करण्यासाठी शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शिरुर तहसिलदार यांच्याकडे रस्ता मागणीचे अर्ज केले होते.

शेतकऱ्यांचा अडचणी समजून घेत या शेत रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत शिरुर तालुक्यातील नवीन रस्ते, रस्ते खुले करणे, पानंद रस्ते, शिव रस्ते असे एकुण तब्बल १२९ रस्ते शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आजपर्यंत खुले केले आहेत व अजूनही रस्त्याच्या बाबतीत आलेल्या अर्जाची दखल घेत प्राधान्याने शेत रस्ते खुले करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहे.

शेत रस्ता मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा.. ?
शेतात जाण्यासाठी रस्ता असणे हा शेतकऱ्यांचा हक्क मानला जातो. ज्या भूमापन क्रमांकाच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळवयाचा आहे, असा भूमापन क्रमांक ज्या महसूल क्षेत्रात येते त्या तालुक्याच्या तहसीलदाराच्या नावे तहसील कार्यालयात लेखी स्वरूपात अर्ज करावा.
– बाळासाहेब म्हस्के, शिरुर तहसिलदार

शिरूर तालुक्यातील किती महिलांना रेशनवर मिळणार साडी पाहा…

पुणे-शिरूर महामार्ग खरंच होणार कोंडीमुक्त; तीन मजली उड्डाणपुलाचे काम मार्चपासून…

शिरूर तालुक्यातील RTI कार्यकर्त्याचा हत्येचा कट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळला…

शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून केले जेरबंद…

शिरूर तहसील कार्यालयातील अधिकारी लाच घेताना पकडला…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

19 मिनिटे ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

23 मिनिटे ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

28 मिनिटे ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

35 मिनिटे ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

11 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

15 तास ago