Talegaon-Ambulance
शिरूर (अरुणकुमार मोटे) : ग्रामीण भागात रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, या उद्देशाने शासनाने आरोग्य केंद्रांना दिलेल्या रुग्णवाहिकेचा वापर रुग्ण नव्हे, तर बिर्याणीच्या पातेल्यांच्या वाहतुकीसाठी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोग्य सेवेच्या जबाबदारीची अशी पायमल्ली होत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका अलीकडेच एका कार्यक्रमासाठी बिर्याणी ने-आण करत असल्याचे दृश्य ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. रुग्णांना तातडीने दवाखान्यात पोहोचवण्यासाठी सज्ज असणारी ही रुग्णवाहिका वैद्यकीय उपयोगाऐवजी खासगी कामांसाठी वापरली जात असल्याने आरोग्य यंत्रणेच्या प्रामाणिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध नोंदवत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “सरकारकडून मोफत उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा असा गैरवापर होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या आरोग्य सेवेला कोण जबाबदार?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
या घटनेमुळे स्थानिक आरोग्य प्रशासनावरही टीकेची झोड उठली जात आहे. संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी सुरू करून, दोषींवर अनुशासनात्मक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
आरोग्य सेवेसाठी महत्त्वाची असलेली रुग्णवाहिका जर बिर्याणी वाहतूक करण्याचे साधन ठरत असेल, तर अशा घटनांनी “सेवा”चे रूपांतर “स्वार्थात” झाल्याचे स्पष्ट होते, अशी चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे. आता दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिरूर! कोरेगाव भीमा येथे खाजगी बसला भीषण आग…
शिरूर! हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत पोलिसांचेही डोळे पाणावले…
Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तलाठ्याची आरेरावीची भाषा; आत्ता जाग आली का…
शिरूर मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी…
शिरूर (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भरदिवसा आज (रविवार) दुपारी पावणे चार वाजण्याच्या…
शिरुर (तेजस फडके) रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर तसेच…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील चांडोह येथे किरकोळ वादातून महिलेस व तिच्या मुलाला व…
शिरुर (अरुणकुमार मोटे) नागपुर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरुर तालुक्याच्या दोन…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता दिवस (Run…
कोरेगाव भीमा (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ आज (गुरुवार) आठवडे बाजाराच्या…