मुख्य बातम्या

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या 84 वर्षीय आजोबांवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करुन त्यांची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे सोमवार (दि 15) रोजी सकाळी घडली.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, शिरुर पोलिसांनी आरोपी नातवाला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले आहे. दशरथ यशवंत राऊत (वय 84, रा. बाभुळसर बुद्रुक, ता. शिरुर, जि.पुणे) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर सोमनाथ बाळासाहेब राऊत (वय 26) या नातवाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृत दशरथ राऊत यांचे पुत्र दुर्योधन दशरथ राऊत यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे आठच्या सुमारास दशरथ राऊत हे नातू सोमनाथ याला शेतातील कामांबाबत सूचना देत असताना सोमनाथ संतापला आणि रागाच्या भरात त्याने घरातील लोखंडी गज उचलून आजोबांच्या डोक्यावर व पाठीवर जोरदार वार केले.

अचानक झालेल्या या हल्ल्यात दशरथ राऊत गंभीर जखमी झाले. डोक्यावर व शरीराच्या विविध भागांवर गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वृद्ध आजोबांचा स्वतःच्या नातवाकडून झालेला खून समजताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेमुळे बाभुळसर बुद्रुक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध सुरु केला. गुन्हा घडल्यानंतर काही तासांतच आरोपी सोमनाथ राऊत याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

24 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

24 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

24 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago