हल्ली वयाचा आणि गुडघेदुखीचा काहीही संबंध राहिलेला नाही. कारण पुर्वी साधारण चाळिशी किंवा पन्नाशीनंतर गुडघेदुखीचा त्रास सुरू व्हायचा. पण आता मात्र तरुण मंडळीही गुडघे दुखत आहेत, अशी तक्रार करताना दिसतात. काही जणांचं वजन खूप वाढलेलं असतं. वाढत्या वजनामुळे त्यांना लवकर गुडघेदुखी सुरू होते. काही जणांचं बैठं काम जास्त असल्याने गुडघ्यांचा व्यायाम होतच नाही आणि त्यामुळे मग गुडघे आखडून जातात आणि दुखायला लागतात. वयानुसार गुडघेदुखीचा त्रासही अनेक वयस्कर मंडळींना होतोच गुडघेदुखीने हैराण असणाऱ्या अशा सगळ्यांसाठीच घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने तयार होणारं एक खास तेल खूप उपयुक्त ठरणारं आहे ते तेल कसं तयार करायचं ते पाहा.
गुडघेदुखी कमी करण्यासाठी उत्तम घरगुती तेल
२ वाट्या मोहरीचं तेल टाका. मोहरीचं तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये १ टेबलस्पून ओवा, १ टेबलस्पून लवंग टाका. त्यानंतर त्यामध्ये २ टेबलस्पून मेथ्या आणि लसूणाच्या ८ ते १० पाकळ्या टाका. लसूण उष्ण असतो. त्यामुळे हिवाळ्यात अशा पद्धतीच्या लसूणयुक्त तेलाने गुडघ्यांना मालिश करणे फायदेशीर ठरते. त्यानंतर तेलामध्ये ओल्याा हळदीचे काही तुकडे आणि १ टेबलस्पून कापुर टाका. असे सगळे पदार्थ टाकल्यानंतर तेलाला १० ते १५ मिनिटे मंद आचेवर चांगले उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. तेल थंड होऊ द्या आणि नंतर ते एखाद्या बाटलीमध्ये, बरणीमध्ये भरून ठेवा. रोज रात्री या तेलाने गुडघ्यांना मालिश करा. मालिश करण्यापुर्वी तेल थोडे कोमट करून घ्यावे.
(सोशल मीडियावरून साभार)
११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना घोड धरणातील पाणीसाठा टिकविण्याच्या…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…