मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात किती मतदान झाले; पाहा सविस्तर आकडेवारी…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात आज (दि २०) रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडले. परंतु सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने शेतीची कामे सुरु असल्याने अनेक गावात मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाकडे पाठ फिरविली. परंतु दुपारनंतर मात्र मतदान केंद्रावर गर्दी केली. त्यामुळे प्रशासनावर ताण आल्याने मतदारांनी रात्री उशिरापर्यंत मतदानाचा हक्क बजावला.

शिरुर तालुक्यातील अनेक गावात आज हिच परिस्थिती पहायला मिळाली. अनेक गावात तरुणांनी यावेळेस मतदानाचा हक्क बजावला. दुपारी तीन नंतर प्रत्येक गावातील मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर मोठया प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी ६ नंतर मतदान केंद्राचे प्रवेशद्वार बंद झाल्यानंतरही मतदान केंद्राच्या मतदारांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे प्रशासनावर मोठया प्रमाणात ताण आल्याचे चित्र पहायला मिळाले.

शिरूर तालुक्यातील मतदानाची आकडेवारी पाहण्यासाठी खालील PDF फाईलला क्लिक करा…
https://drive.google.com/file/d/1CFabKFBBNQnDbVRzk78gmwwO_HyyaB16/view?usp=sharing

Video: वाघोलीत मतदान केंद्रात पोलिंग एजंटला दमबाजी: अशोक पवार

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात ७०.४९ टक्के मतदान…
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात ३४६ मतदान केंद्रावर एकूण दोन लाख २१ हजार ५११ मतदान झाले आहे. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या एक लाख १७ हजार ३३६ व महिला मतदारांची संख्या एक लाख चार हजार १७१ आहे. बुधवारी (ता. २१) रात्री उशिरा मतदान आकडेवारी प्राप्त झाली. एकूण मतदान ७०.४९ टक्के झाले आहे.

मतदारसंघात महायुती-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व महाविकास आघाडी-राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त जयवंत निकम यांच्यात मुख्य लढत आहे. दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते विजयाचे दावे-प्रतिदावे करत आहेत. निवडणूक शनिवारी (ता. २३) रोजी आहे. निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मंचर ६३.६५ टक्के, घोडेगाव ६०.१३ टक्के, अवसरी खुर्द ७३.६० टक्के, रांजणगाव गणपती ६९.८९ टक्के, पाबळ ६५.४२ टक्के, कवठे येमाई ६९.७७ टक्के मतदान झाले आहे.

शिरुर तालुक्यात रात्री मतदारांनी रात्री उशिरापर्यंत बजावला मतदानाचा हक्क

Video: आंबेगाव-शिरुर मतदार संघांचे उमेदवार देवदत्त निकम यांच्याशी थेट बातचीत…

Video: अजित पवार यांच्या टिकेला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच सडेतोड उत्तर…

Live Video: अजित पवार यांची न्हावरे येथील सभेत बोलताना म्हणाले…

Live Video: गुलाबी रंगाने गद्दारीचा कलंक झाकला जात नाही: अमोल कोल्हे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

2 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

2 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

2 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

2 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

2 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

2 तास ago