ajit-pawar-amol-kolhe

Video: अजित पवार यांच्या टिकेला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच सडेतोड उत्तर…

मुख्य बातम्या राजकीय शिरूर तालुका

शिरूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टिकेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मी जर तोंड उघडलं तर अनेकांची अडचण होईल. मला शरद पवारांनी मला मांडीवर घेऊन अनेक मंत्री पदे दिली नसल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचार सभेत हजेरी लावली. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले की, अजितदादा आपल्या विरुद्ध बरेच बोलले आहेत. माझ्या मतदारसंघात मी त्यांना उत्तर देणार नाही तर तुमच्या मतदार संघात येऊन उत्तर देणार आहे. ‘इलाका तुम्हारा धमाका हमारा है! असे म्हणतानाच मी जर तोंड उघडलं तर अनेकांची अडचण होईल असा इशाराही त्यांनी दिला.

अमोल कोल्हे म्हणाले, ‘पवार साहेबांनी मला मांडीवर घेऊन अनेक मंत्री पदे दिली नाहीत. शरद पवारांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र पिंजून काढले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. शरद पवारांचा काही नेम नसून महाराष्ट्र सरकार तो झाँकी है, केंद्र सरकार बाकी है. शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव का नाही? राज्यातील उद्योग बाहेर गेले, रोजगार बुडाला आहे. विकास विकास म्हणता मग दिवसाला आठ महिन्याला 200 शेतकरी का आत्महत्या करतात? महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची मग या विकासाचा फायदा काय? असा सवालही त्यांनी केला.

शरद पवार यांना ज्यांनी सोडलं त्यांना सोडण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांची लाट होती, आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुनामी येणार आहे. मतदान वीस, निकाल तेवीस आणि घरी पाठवायचे शिंदे, फडणवीस असे आवाहनही डॉ. कोल्हे यांनी केले आहे.

Live Video: गुलाबी रंगाने गद्दारीचा कलंक झाकला जात नाही: अमोल कोल्हे

राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या दाजीच्या शेतमालाला आणि दुधाला बाजारभाव द्यावा; डॉ अमोल कोल्हे

शिरुरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन तालुकाध्यक्षाच्या गावातच डॉ. अमोल कोल्हे यांना आघाडी…

Live Video: अजित पवार यांची न्हावरे येथील सभेत बोलताना म्हणाले…

Live Video: शरद पवार यांनी वडगाव रासाई येथे अजित पवार यांची केली नक्क्ल…

Live Video : आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार : शरद पवार

Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार