शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील बाबुरावनगर येथील श्री गणेशा हॉस्पिटलच्या शेजारी नगर-पुणे रस्त्यावर भैरवनाथ कृपा सहकारी गृह रचना मर्यादित शिरुर या ठिकाणी वास्तव्यात असलेले काही परराज्यातील युवक एकत्रित राहत होते. त्यामधील मोहताब शाहिद आलम या युवकाचा (दि १८) मार्च 2024 रोजी गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.
शिरुर पोलिसांनी या घटनेच्या तपासाची चक्रे वेगात फिरवत तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर फिर्यादी व मयताचा चुलत भाऊ मासुम समिद आलम (मुहम्मद) हाच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुह्यात वापरलेला चाकू, आरोपीच्या बनियनवर मिळालेले रक्ताचे डाग, बरमोडा, चाकुसह गुडांळून आरोपीने तो बिल्डींगच्या लिप्ट च्या डक मध्ये टाकून दिला होता. तो पोलिसांना तपासात मिळून आला आहे.
मयताचा भाऊच भावाचा वैरी निघाला असून त्याने हा हा खुन नक्की कशासाठी केला…? याचा तपास शिरुर पोलिस करत आहेत. सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस नाईक नाथा जगताप, बाळू भवर, पोलिस हवालदार नितीन सुद्रिक, पोलिस अंमलदार रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात यांच्या पथकाने केली आहे.
शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्था अध्यक्षासंह पाच जणांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…