Video; कोल्हेंच्या PA नां MIDC मध्ये यायला वेळ आहे, पण आमची काम करायला वेळ नाही काँग्रेस कार्यकर्त्याची नाराजी

राजकीय शिरूर तालुका

कारेगाव (तेजस फडके) सध्या लोकसभेच्या प्रचाराला जोरदार सुरवात झाली असुन शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडुन शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे. सध्या कोल्हे आणि आढळराव यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगलेला असताना खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे स्वीय सहायक (PA) तेजस झोडगे यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष (महाराष्ट्र प्रदेश फिशरमॅन, काँग्रेस) यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

माजी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजुनही अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केलेला नाही. परंतु खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील हेच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. डॉ अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली हि चूकच झाली अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच मांडवगण फराटा येथील शेतकरी मेळाव्यात दिली होती. तसेच डॉ अमोल कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी खुद्द अजित पवार यांनी कंबर कसली आहे.

 

त्यातच आता राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे पदाधिकारी असलेले विजय डिंबर यांनी डॉ अमोल कोल्हे यांचे स्वीय सहायक तेजस झोडगे यांच्या कार्यपद्धतीवर टिका करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे डॉ कोल्हे यांची डोकेदुखी वाढणार आहे. विजय डिंबर म्हणाले, गेले आठ दिवस मी एका कामा संदर्भात तेजस झोडगे यांना अनेकवेळा फोन केले व मेसेजही टाकले. परंतु झोडगे यांनी मला कसलाच प्रतिसाद दिला नाही. माझा विषय गंभीर असतानाही झोडगे यांनी टाळाटाळ केली.

 

सन 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत डॉ अमोल कोल्हे यांना खासदार करण्यासाठी आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम करुन जीवाचं रान केलं. पण आमच्याकडे गाऱ्हाणं घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कामासाठी खासदारांचे स्वीय सहायक (PA) तेजस झोडगे टाळाटाळ करत आहेत. झोडगे यांना रांजणगाव MIDC मध्ये यायला वेळ आहे. पण मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांची काम करायला वेळ नाही असा आरोप त्यांनी केला.

लोकसभेच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील बारा गावचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार…? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नाराजी

शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्था अध्यक्षासंह पाच जणांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल

सावधान; पालकांनो शिरुर मधील इंग्लिश माध्यमातील शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेताय ;तर हि बातमी नक्की वाचा