मुख्य बातम्या

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्ष आणि चिन्हही ठरले…

शिरुर (तेजस फडके): शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावेळीच शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शिरूर लोकसभेच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणार आहे. महायुतीमध्ये शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडे असणार आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रवेशामुळे या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत रंगणार आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा या मतदारसंघातून पराभव केला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी निवडणुका होणार आहेत.

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे खासदार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीनंतर अमोल कोल्हे शरद पवार गटात गेले. त्यानंतर आता शिरुरमध्ये महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे, पाडणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट शड्डूच ठोकला होता. तेव्हापासूनच शिरूरवर संपूर्ण राज्याच्या नजरा खिळल्या होत्या. एवढंच नाहीतर या मतदार संघावरुन महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळाला. पण, त्यानंतर शिरूर मतदारसंघ अजित पवार यांना सोडण्यात आला. अशातच लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या आढळरावांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेच्या शिवाजी आढळराव पाटलांवर 2009 आणि 2014 साली शिरूरच्या मतदारांनी विश्वास टाकला. हॅट्रिक मारलेल्या आढळरावांची 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या घाटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांच्यासोबत बारी झाली. अपेक्षेनुसार कोल्हेंनी बारी मारली. पण कोल्हेंना निवडून आणण्यात अजित पवारांचाचा हात होता. कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केल्याचं अजित पवारांनी जाहीरपणे अनेकदा बोलून दाखवलं आहेच. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला निवडून आणलं, त्यालाचा पाडण्याचा चंग अजितदादांनी या निवडणुकीत बांधला आहे. अशातच आढरावांना उभं करुन दादा सध्या शिरूरमधून अमोल कोल्हेंना पाडणार का? अजितदादा शिरूरची बारी मारणार का? हे येता काळच सांगणार आहे.

अजित पवार यांचा अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठा डाव; शिरूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला…

शिवाजीराव आढळराव पाटील हातात बांधणार घड्याळ! मुहूर्तही ठरला…

शिरूरमध्ये आढळराव पाटील यांचे तिकीट कन्फर्म? कट्टर विरोधकाची घरी जाऊन भेट…

आढळराव पाटील आणि अजित पवार यांचा एकाच गाडीत प्रवास; चर्चांना उधाण…

अजित पवारांच्या टिकेनंतर अमोल कोल्हेंचा पलटवार, पक्षात येण्यासाठी लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या…?

शिरुरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टिका, तर अशोक पवारांबाबत सौम्य भुमिका

अमोल कोल्हे यांच्या सारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक: अजित पवार

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

12 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago