मुख्य बातम्या

सिंघमगिरी; रांजणगाव MIDC पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचत चार अपहरण झालेल्या कामगारांची केली सुटका

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC त काम करणाऱ्या चार कामगारांचे अपहरण करुन त्यांना डांबून ठेवत बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या नातेवाईकांनाकडुन फोन पे द्वारे ७५ हजार रुपयांची खंडणी वसुल करुन अजुन २५ हजारांची मागणी करणाऱ्या खंडणी खोरांकरुन सिनेस्टाईल पद्धतीने अवघ्या एक तासात अपहरण झालेल्या चार कामगारांची सुटका करुन एका खंडणीखोराला अटक करण्याची धाडसी कामगिरी रांजणगाव MIDC पोलिसांनी केली आहे. या सर्व ‘सिंघम’ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सगळीकडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढोकसांगवी येथे संतोष मनमोहन बेहरा, सुदर्शन नगबहन बेहरा, संतोष सुरिंद्र परिडा, संतोष बसंत बेहरा तसेच अशोक शेट्टी असे पाच जण राहत असुन शनिवार दि ६ जुलै २०२४ रोजी संतोष मनमोहन बेहरा आणि संतोष बसंत बेहरा हे दोघेजण पाचंगेवस्ती येथील बाजारामध्ये कामानिमित्त गेलेले असताना तीन दुचाकीवर सहा अनोळखी इसम आले. त्यांनी वरील दोन्ही कामगारांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि पाचंगेवस्ती येथील ते कामगार राहत असलेल्या खोलीवर नेले.

 

त्यानंतर त्यांनी या कामगारांचे दोन मित्र सुदर्शन नबगन आणि संतोष परिडा यांना खोलीच्या बाहेर बोलावले आणि त्या दोघांनाही जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. तीन दुचाकीवर या चार जणांना घेऊन पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या एका चार मजली इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर एका खोलीत नेले. तसेच आरोपी योगेश बारवकर याने मानस बेहरा याच्या मोबाईलवर फोन करुन “तेरे भाई और तिनो दोस्तो के हर एक अकाउंट पे २५ हजार भेज दो, नही तो मैं उनको मार दूंगा” अशी धमकी दिली व प्लास्टिकचा पाईप आणि कंबरेच्या बेल्टने या चारही कामगारांना मारहाण केली.

 

या चार कामगारांकडे पैसे नसल्याने त्यांनी गावी फोन करुन सहा जणांनी आमच्या चौघांचे अपहरण केले असुन आमच्या प्रत्येकाच्या अकाउंटला २५ हजार रुपये याप्रमाणे ७५ हजार पाठवा. अन्यथा हे सहाजण आम्हाला जिवे ठार मारतील असे सांगितले. त्यानंतर तीन कामगारांच्या घरातील व्यक्तींनी फोन पे द्वारे २५-२५-२५ असे ७५ हजार रुपये त्या तिघांच्या अकाउंटला पाठवले. त्यानंतर आरोपी योगेश बारवकर याने तिघांच्या फोन पे वरुन ते ७५ हजार रुपये त्याच्या मित्राच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. परत मानस बेहरा याला फोण करुन संतोष सुरेंद्र परिडा याचे २५ हजार रुपये लवकर पाठव अन्यथा त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.

 

आरोपीसाठी पोलिसांनी रचला सिनेस्टाईल सापळा…
त्यानंतर मानस बेहरा याने आरोपी योगेशला कारेगावच्या चौकात पैसे घेऊन येतो असे सांगितले. त्यानंतर मानसने रांजणगाव MIDC पोलिसांशी संपर्क साधत हा अपहरणाचा सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे, पोलिस हवालदार संदीप जगदाळे, विलास आंबेकर, राजेश कर्डीले, प्रतिक खरबस, संदीप भांड यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी एम एच १२ व्ही सी ४८७९ या चारचाकी गाडी मध्ये अपहरण केलेल्या तीन कामगारांना घेऊन योगेश बारवकर आणि विनोद चाबुकस्वार हे कारेगावच्या चौकात आले.

 

अपहरण केलेल्या कामगारांची सुटका…
त्यानंतर सापळा रचलेल्या पोलिसांनी चारचाकी गाडीत असलेल्या चार कामगारांची तातडीने सुटका करत आरोपीला पकडण्यासाठी धाव घेतली. परंतु योगेश बारवकर रा. शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे हा तिथुन पळुन गेला.तर यातील एक आरोपी विनोद राजेंद्र चाबुकस्वार रा. सुरजनगर, ता. शिरुर, जि. पुणे याला पोलिसांनी अटक केली असुन त्याला शिरुर न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे संतोष मनमोहन बेहरा (वय १९) सध्या रा. ढोकसांगवी, व्हील्स इंडिया कंपनीच्या पाठीमागे, मूळ रा. समरपुर ता. अहलापुर, जि. जासपुर, उडीसा याने फिर्याद दाखल केल्याने योगेश बारवकर, विनोद चाबुकस्वार तसेच त्यांच्या इतर पाच साथीदारांविरोधात चार कामगारांचे अपहरण करुन खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे हे करत आहेत.

 

रांजणगाव MIDC त परप्रांतीय कामगारांना मारहाण करुन धमककावल्याचे अनेक गैरप्रकार होत असल्याच्या घटना वारंवार घडत असुन मारहाणीच्या भीतीने अनेकजण तक्रार दाखल करत नाहीत. परंतु जर अशी कोणाची फसवणूक होत असल्यास त्यांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा.

मनोज नवसरे 

सहायक पोलिस निरीक्षक 

शिरुर तालुक्यातील एका शासकीय पाझर तलावाला लागली भुक ;हजारो ब्रास गौण खनिज केले गिळंकृत

शिरुर; कृषी दिनानिमित्त कृषी सहायक जयवंत भगत यांचा सन्मान

मारहाण करणाऱ्या निलंबित शिक्षकांची मुजोरी, प्रशासनालाही जुमानेना, शाळेवर करतायेत नियमित कामकाज

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

17 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago