शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात बोगस बियाण्याने शेतकरी हतबल; अधिकारी वसुलीत मग्न…

शिरूर (अरुणकुमार मोटे): कंपनीने बोगस बाजरीचे बियाणे दिल्यामुळे शिरूर तालुक्यात अनेक गावांमध्ये बाजरी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पंचायत समितीचे कृषी अधिकारी मात्र दुकानदारांकडून वसुलीत मग्ण असल्याची चर्चा होत आहे.

शिरूर तालुक्यातील सविंदणे, कवठे, मलठण, टाकळी हाजी, फाकटे, आण्णापूर, आमदाबाद, पिंपरखेड, काठापूर, जांबुत, न्हावरे, गोलेगाव, आंबळे, निमोणे, पाबळ, जातेगाव, कान्हूर मेसाई अशा अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी पाऊस पडल्यामुळे पेरणी केलेले बाजरी बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

यंदा जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लवकरच पेरण्या केल्या. शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी केली. मात्र, काही ठिकाणी बियाणे नित्कृष्ट दर्जाचे निघाल्याने उगवणच झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी एकरी जवळपास १० ते १५ हजार रुपयांचा खर्च केला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बियाणे देणारे डिलर, कृषी सेवा केंद्र दुकानदार, कृषी अधिकारी यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या आहे. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

शिरूर तालुक्यात खरिपाचे एकूण २७ हजार ४३३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी बाजरीची १९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेते व डिलर यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, आता शेतकरी पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.

शिरूर तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी एका खाजगी कंपनीच्या बाजरी बियाण्याची पेरणी केली असल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी नंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. या सर्व प्रकारानंतर तालुका कृषि विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांच्या संकटात होतेय मोठी वाढ…
शिरूर तालुक्यात विदयुत रोहीत्र, विद्युत मोटारी ,केबलची चोरी, बिबट्याचे हल्ले,कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, कधी गारपीट तर कधी दुबार पेरणी, या संकटामुळे शेतकरी होरपळून निघत आहे. संकटाशी मुकाबला करत शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करताना दिसत आहे. आता शेतकरी बोगस बाजरी बियाणांमुळे उद्भवलेल्या पेरणीच्या संकटामुळे त्रस्त झाले आहेत. अगोदरच प्रचंड हालअपेष्टांनी युक्त जीवन जगणाऱ्या बळीराजाला दुबार पेरणी करावी लागणार आहे. बोगस बियाणे देऊन दुकानदार व कंपनीने शेतकऱ्यांची एकप्रकारे फसवणूकच केली आहे. ज्या कृषी सेवा केंद्रातून व कंपनीकडून हे बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी पेरले त्या दुकानदार व कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी करत आहेत. हे सर्व घडत असताना पंचायत समितीचे कृषी अधिकारी काय करतात हा मोठा प्रश्न उभा राहत आहे. हे अधिकारी फक्त दुकानदारांकडून व्हिजिटच्या नावाखाली लुटत असल्याची चर्चा होत आहे. दुकानदार यामुळे पुरते वैतागले आहे. युरीया घेताना लिकिंग खते देण्याची सक्तीबाबत ते मात्र मौन बाळगत आहे. त्यांना फक्त वसुलीचे देणे घेणे असून शेतकऱ्यांविषयी कळवळा राहीला नाही.

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी. त्यावर बियाणे खरेदी करणाऱ्याचे नाव, पिकाचे व जातीचे नाव, गट क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, विक्रेत्याची सही ई त्यादी नोंदी असाव्यात. कोणतेही बियाणे घेताना परवानाधारक कृषी केंद्रधारक विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. बियाण्याची उगवणक्षमता, शुद्धता, चाचणीची तारीख इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. प्रमाणित बियाण्याच्या टॅगवर अधिकाऱ्यांची सही असल्याची खात्री करून घ्यावी. या कृषी विभागाच्या सूचना शेतकऱ्यांनी लक्षात घ्याव्यात म्हणजे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक होणार नाही.
– सिद्धेश ढवळे, तालुका कृषी आधिकारी

मारहाण करणाऱ्या निलंबित शिक्षकांची मुजोरी, प्रशासनालाही जुमानेना, शाळेवर करतायेत नियमित कामकाज

राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या दाजीच्या शेतमालाला आणि दुधाला बाजारभाव द्यावा; डॉ अमोल कोल्हे

शिरुर तालुक्यातील एका शासकीय पाझर तलावाला लागली भुक…हजारो ब्रास गौण खनिज केले गिळंकृत…

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

शिरूर तालुक्यात युरिया टंचाई; शेतकरी हवालदिल; अधिकाऱ्यांना मलई…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

12 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

15 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

17 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago