मुख्य बातम्या

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल मलठण येथे संपन्न

शिरूर अरुणकुमार मोटे): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे,शिरूर तालुका क्रीडा संघटना न्यू इंग्लिश स्कूल मलठण व सागरआप्पा दंडवते स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल मलठण च्या प्रांगणात तालुकास्तरीय खो-खो स्पर्धांचे आयोजन दि.५,६,७ सहा सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. शिरूर तालुक्यातील विविध शाळेतील १४, १७ व१९ वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या एकूण तब्बल २०२संघांनी सहभाग नोंदवला अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य आसवले यांनी दिली.

या खोखो स्पर्धेत मुलांच्या १४ वर्षे वयोगटात न्यू इंग्लिश स्कूल मलठण प्रथम क्रमांक मुले,कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव प्रथम मुली, सतरा वर्षे वयोगटात मुले प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल मलठण,मुली प्रथम क्रमांक पलांडे पाटील प्रगती हायस्कूल मुखई, १९ वर्षे वयोगटात मुले सिटीबोरा शिरूर,मुली प्रथम क्रमांक काळेश्वर विद्यालय कारेगाव या संघाने प्रथम क्रमांक पटकावला

सर्व विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.आदर्श कोच म्हणून नरोटे सर,धीरज दंडवते,अक्षय गायकवाड, आकाश गोडसे यांचा सन्मान करण्यात आला या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मलठण नगरीच्या सरपंच माधुरी थोरात,राजपत्रित क्रीडा अधिकारी पुणे मिलिंद करपे, शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे, राष्ट्रीय खेळाडू भावेश माशेरे, शुभम थोरात,सचिन थोरात व मान्यवर व क्रिडाप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ढसाळ सर यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या प्राचार्या आसवले मॅडम यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत इशस्तवनाने दंडवते गुरुजी आणि विद्यार्थिनींनी केले. प्रस्तावित गायकवाड सर तर मान्यवरांचे आभार आयोजक सागर आप्पा दंडवते यांनी केले.स्पर्धा यशस्वी करण्यात पर्यवेक्षिका टिकले मॅडम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी स्वयंसेवक यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

12 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

13 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

13 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

14 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

14 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

14 तास ago