शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील एका गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका युवकासह त्याच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांसह एकूण आठ जणांविरुद्ध तसेच अन्य १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ अंतर्गत अनेक कलमांसह गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार जून २०२६ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत मुख्य आरोपीने अल्पवयीन मुलीच्या कमी वयाचा व अज्ञानाचा फायदा घेत तिच्यावर वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्याशी लग्न करणार नसल्याची धमकी देऊन तिला गप्प ठेवण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलीसांत तक्रार दाखल होऊ नये म्हणून आरोपी पक्षाकडून वारंवार दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर २ ऑगस्ट रोजी रात्री फिर्यादी यांच्या घरी दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान मुलीवरील कथित अत्याचाराबाबत जाब विचारल्यानंतर आरोपी पक्षातील व्यक्तींनी फिर्यादी कुटुंबाला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला दुखापत झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…