मुख्य बातम्या

प्रशासक, शिरुर नगरपरिषद यांनी केलेला प्रशासकीय ठराव रद्द करावा…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषदेकरीता घन कचरा व्यवस्थापन व इतर अनुषांगिक कामे करण्याच्या अभिकरणास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो नियमबाहय आहे. त्यामुळे शिरुर नगरपरिषद यांनी केलेला प्रशासकीय ठराव रद्द करावा, अशी मागणी शिरूरमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

शिरूर नगर परीषदेने घन कचरा व्यवस्थापन व इतर अनुषांगिक कामे या अभिकरणाची निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक होते. निविदा प्रक्रिया न राबविता काम करणे म्हणजे हेतुपरस्पर घन कचरा व्यवस्थापन ठेकेदारास मदत करण्याचे हे नियमबाहय कृत्य आहे. निविदा प्रक्रिया न राबविता ठेकेदारास एक वर्षे मुदतवाढ का देण्यात आली? याचा बोध होत नाही शिरुर नगरपरिषदेने नियमानुसार कारवाई करावी. नगरपरिषदेने केलेला ठराव रद्द करून सदर कामाच्या निविदा प्रक्रिया तात्काळ राबवावी.

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसताना व नगरपरिषदेला सदर अभिकरणाची मुदत संपत असल्याचे माहिती असुनही मुख्याधिकारी, शिरुर नगरपरिषद यानी निविदा प्रक्रिया वेळेत राबविली नाही. त्यामुळे शहरामध्ये विविध चर्चांना उधान आले आहे, ही गंभीर बाब आहे त्यामुळे नागरिकांचे शिरूर नगर परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शासन परिपत्रकानुसार कोणत्याही निविदा ‘करारास मुदतवाढ देण्यात येऊ नये, असे आदेश असतानाही नियमबाह्यपणे मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे नगरपरिषदेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे, असे पत्र जिल्हाधिकारी पुणे यांना देण्यात आले असून सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन ‘प्रशासकीय ठराव’ रदद् करून तात्काळ निविदा प्रक्रिया राबवावी अन्यथा याविरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसे मा. शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

9 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

9 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

9 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

9 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

9 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

13 तास ago