महाराष्ट्र

विधानसभेत लक्षवेधीला उत्तर आणि दोन तासात शासन निर्णय; सुधीर मुनगंटीवार

मुंबई: राज्य शासनाच्या गतिमान कारभाराची चर्चा नेहमीच होते. आज त्याच गतिमान कारभाराची चुणूक वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवली. विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात त्यांनी गडचिरोली येथील बांबू व्यवस्थापन संदर्भात समिती स्थापन घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत केवळ दोन तासातच यासंदर्भातील शासन आदेश जारी केला.

वनविभाग गडचिरोली, आलापल्ली व वडसामध्ये सामूहिक वनहक्क व पेसाअंतर्गत शाश्वत बांबू व्यवस्थापनासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यासंदर्भात हा शासन आदेश आहे. या समितीत डॉ. होळी हे अध्यक्ष असतील. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली, गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, उपवनसंरक्षक हे सदस्य असतील, तर विभागीय वन अधिकारी दक्षता, गडचिरोली वनवृत्त हे सदस्य सचिव असतील.

समितीच्या माध्यमातून सामूहिक वन हक्क व पेसाअंतर्गत प्राप्त अधिकारानुसार बांबू संवर्धन करून स्थानिकांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सुधारणा सुचविणे, सामूहिक वनहक्क बाहेरील वनक्षेत्रात बांबूच्या जास्त कापणीबाबत आलेल्या तक्रारींची तपासणी आणि चौकशी करणे आणि योग्य कारवाईसाठी प्रस्तावित करणे, तसेच भविष्यात अश्या कोणत्याही घटना टाळण्यासाठी योग्य धारणांची शिफारस करणे, बांबू रोपवन कार्यक्रमात सुधारणा करणे, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन योजना तयार करणे आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक साहाय्य वनविभागामार्फत पुरविण्याबाबत शिफारशी करणे या विषयांचा अभ्यास करण्यात येईल. समितीला आपला अहवाल देण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

6 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

7 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

7 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

7 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

7 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

18 तास ago