शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही उमेदवार विजयी झाले. वृषाली वाळके यांनी माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांचा अवघ्या 56 मतांनी पराभव केल्याने पाचर्णे कुटुंबाचे सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न भंगले.
शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी समोरासमोर लढत होती. वृषाली बबन वाळके या मालती पाचर्णे यांच्यासमोर नवख्या उमेदवार होत्या. तरीही हि लढत अतिशय चुरशीची ठरली. न्हावरे गणात दिपक कोकडे (पवार) विरुद्ध सागर खंडागळे या लढतीत कोकडे यांना 5207 मताधिक्य मिळालं तर निमोणे गणात स्वाती घावटे विरुद्ध उज्ज्वला भोस या लढतीत घावटे यांना 2750 एवढं मताधिक्य मिळालं.
करडे गावात दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्यपद
सन 2018 साली करडे गावातील राजेंद्र जगदाळे पाटील यांनी राहुल पाचर्णे यांचा पराभव केला होता. त्यानंतर आठ वर्षांनी आत्ता सन 2026 च्या निवडणुकीत वृषाली वाळके यांनी मालती पाचर्णे यांचा अवघ्या 56 मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे करडे गावाला दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य होण्याचा मान मिळाला आहे.
मालती पाचर्णे यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी…
शिरुर-हवेलीचे माजी आमदार लोकनेते स्व बाबुराव पाचर्णे यांचे तीन वर्षांपुर्वी निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला जिल्हा परिषद सदस्य म्हणुन संधी मिळावी. यासाठी या गटातील कार्यकर्त्यांनी गेल्या 8 ते 10 दिवसात जीवाचे रान केले होते. परंतु नवख्या उमेदवारासमोर मालती पाचर्णे यांचा अवघ्या 56 मतांनी पराभव झाल्याने हा पराभव भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…