महाराष्ट्र

अटीतटीच्या लढतीला हिंसाचाराची किनार! शिंदे गटाचा पराभव, गोपीचंद पडळकरांच्या वहिनींनी मारली बाजी

आटपाडी: राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली असून निकालांचे चित्र स्पष्ट होत आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात भाजपने महत्त्वाचा गड राखला आहे. आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विद्या मोटे यांचा ९८० मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे.

सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही फेऱ्यांमध्ये शिंदे गटाच्या विद्या मोटे आघाडीवर होत्या. मात्र, दुपारनंतर चित्र बदलत गेले आणि अखेर संध्याकाळी माधवी पडळकर यांनी निर्णायक आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

माधवी पडळकर या भाजपचे फायरब्रँड आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी असून त्या जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या विजयानंतर आटपाडी तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

दरम्यान, ही निवडणूक वादाच्या पार्श्वभूमीवरही चर्चेत राहिली होती. प्रचारादरम्यान सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये वाद झाला होता. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विद्या मोटे यांच्या प्रचारासाठी फिरणाऱ्या वाहनावर गोपीचंद पडळकर समर्थकांनी तोडफोड केल्याचा आरोप झाला होता.

माहितीनुसार, विभूतवाडी येथे माधवी पडळकर यांची सभा सुरू असताना विद्या मोटे यांची प्रचारगाडी त्या ठिकाणी आली. यावेळी आवाजावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारी व वाहनाच्या तोडफोडीत झाले होते. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आटपाडीतील निंबवडे गटात पडळकर विरुद्ध मोटे अशी लढत राज्यभरात लक्ष वेधून घेणारी ठरली. अखेर मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याने आटपाडीत पडळकर कुटुंबाचा राजकीय प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

12 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

15 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

16 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

16 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

16 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

17 तास ago