मुख्य बातम्या

निमोणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद अखेर मिटला, सामंजस्याने ग्रामसभेत निर्णय

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे गावात अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याप्रकरणी ग्रामसेवक बाळासाहेब शेळके यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केल्याने दोन माजी सरपंचासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत निमोणे येथील हनुमान मंदिरात मंगळवार (दि १५) रोजी ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी सामंजस्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परवानगीच्या कागदपत्रांची जोपर्यंत पुर्तता होत नाही तोपर्यंत पुतळा झाकुन ठेवण्याबाबत सर्वच ग्रामस्थांचे एकमत झाले.

 

यावेळी गावातील ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक बाळासाहेब शेळके यांनी सांगितले की, गावातील चौकात अनधिकृतपणे उभा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत निमोणे ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र आणि स्वराज्य ध्वज उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु प्रत्यक्ष पुतळा उभारण्याची अधिकृत परवानगी मात्र घेतली गेली नव्हती. त्यामुळे नाईलाजास्तव पोलिस तक्रार करावी लागली आणि या प्रकरणात १७ जणांवर गुन्हा दाखल झाला.

 

निमोणे गावातील चौकात अनेक दिवसांपासून चौथरा उभारण्याचे काम सुरु होते. शुक्रवार (दि ११) रोजी रात्री चौथऱ्याचे काम पुर्ण झाल्यानंतर गावातील दोन माजी सरपंच आणि सदस्यांनी त्या चौथऱ्यावर कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. यामुळे गावात तणाव निर्माण झाला आणि काही ग्रामस्थांनी यावर आक्षेप घेतला.

 

निमोणे गावचे ग्रामपंचायत सदस्य अतुल दुर्गे आणि शामकांत ढोरजकर यांच्यासह काही ग्रामस्थांनी हे काम लोकवर्गणीतुन व्हावे तसेच चौथऱ्यावर कोणाचेही वैयक्तिक नाव नसावे हि बाब पुढे करत पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केले होते. ग्रामसभेत याविषयावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी माजी सरपंच शामकांत काळे तसेच संजय काळे यांनी अनेक कामाचे दाखले देत आम्ही नावासाठी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे देखणे शिल्प गावातील चौकात झाल्यास गावाच्या वैभवात भर पडेल. यासाठी तसेच ग्रामस्थांनी काही कामात लोकवर्गणीला जास्त प्रतिसाद न दिल्याने स्वतःच्या खिशातुन छत्रपतींचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

 

यावेळी सर्वच ग्रामस्थांचे मत विचारात घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कायदेशीर परवानगीसाठी सर्वानुमते गावपातळीवर एक समिती स्थापन करण्याचे ठरले. तसेच निमोणे गावाच्या वैभवात भर पडणारी वास्तू जर गावात वैयक्तिकरीत्या कोणी बांधत असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. तसेच ग्रामपंचायत शामकांत ढोरजकर आणि अतुल दुर्गे यांनी आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध नव्हता. तर तो पुतळा लोकवर्गणीतुन व्हावा तसेच त्याच दिमाखात वाजत गाजत अनावरण व्हावं हा उद्देश असल्याच ग्रामसभेत स्पष्ट केल. तसेच आम्ही केलेल्या तक्रारीबाबत आम्ही ग्रामस्थांना सकारात्मक मदत करु असेही यावेळी त्यांनी आश्वासन दिले.

 

यावेळी शिरुर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दिपक करांडे पोलिस हवालदार विशाल कोथळकर, प्रताप टेंगले, पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग बागल, ईश्वर चव्हाण, शेखर झाडबुके या पोलिस कर्मचाऱ्यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. या ग्रामसभेत माजी सरपंच विजय भोस, संतोष काळे, विजय पोटे, पुरुषोत्तम जगदाळे, विनोद काळे तसेच अनेक ग्रामस्थांनी आपापली मते व्यक्त केली.

 

निमोणे गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यासाठी संपूर्ण गावाने एकमताने सहमतीने ठराव घेतलेला असुन गावातील सर्वच ग्रामस्थांनी एकमताने छत्रपतींच्या मूर्ती स्थापनेसाठी सकारात्मकता दाखवून एकजुटीचा नवीन आदर्श निर्माण केलेला आहे. छत्रपतींचा पुतळा कायदेशीररीत्या स्थापन करण्यासाठी अनेक कायदेशीर परवानग्या आणाव्या लागणार असुन ग्रामस्थांसाठी हा खरा संघर्षाचा काळ असेल. त्यासाठी संपूर्ण गाव एकजुटीने प्रयत्नशील राहील. तसेच सदर प्रकरणातील गुन्हा दाखल झालेल्या आरोपीना मोफत कायदेशीर मदत करणार आहे.

अ‍ॅड सुमित देविदास पोटे

ग्रामस्थ, निमोणे 

शिरुर-हवेलीत कसा जमणार सत्तेचा खेळ…? आचारसंहिता जाहीर झाली तरीही महायुतीचा अजुनही नाही मेळ

शिरुर तालुक्यात नॉनव्हेज खाताय…? मग इकडे लक्ष द्याच

निमोणे येथे अनधिकृत पुतळा बसविल्याप्रकरणी २ माजी सरपंचांसह १५ जणांवर गुन्हा दाखल

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago