मुख्य बातम्या

शिरुर-हवेलीतुन ज्ञानेश्वर कटके प्रबळ दावेदार; महायुतीकडुन ज्ञानेश्वर कटके निवडणुकीच्या रिंगणात…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कांग्रेसकडे असल्याने या मतदारसंघातुन खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुक लढविणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र अजित पवार आपल्या बारामती मतदारसंघातूनच रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शिरुर-हवेलीत उमेदवार देताना इलेक्टीव्ह मेरीट पाहूनच उमेदवारी दिली जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केल्याने या मतदारसंघातून महायुतीकडून प्रबळ दावेदार असलेले ज्ञानेश्वर कटके यांची उमेदवारी महायुतीकडून जवळपास निश्चित मानली जात आहे. तर महायुतीमधील अन्य घटक पक्षांकडूनही कटके यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे.

 

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडुन विद्यमान आमदार अशोक पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याने त्यांच्या तोडीस तोड किंबहुना विजयी होणाऱ्यालाच उमेदवारी देण्याबाबत अजित पवार ठाम आहेत. लोकसभेच्या प्रचारादरम्यान शिरुर तालुक्यात प्रचारा दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभेत तू कसा आमदार होतो, असा थेट इशारा आमदार अशोक पवार यांना दिला होता. अजित पवार यांनी दिलेले हे आव्हान पूर्णत्वास नेण्यासाठी ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे पाहिले जात आहे.

 

महायुतीकडून शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात करण्यात आलेल्या सर्वेक्षणनुसार भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट) या तीनही पक्षाकडून ज्ञानेश्वर कटके यांच्या बाजूनेच जनतेचा कौल असल्याचे समोर आल्याने महायुतीमध्ये उमेदवारीसाठी कटके यांना विविध माध्यमातून संपर्क करुन गळ घालण्याचा प्रयत्न होत आहे. महायुतीमधील भाजपा तसेच शिवसेना शिंदे गटाकडूनही कटके यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आले आहे.

 

त्यामुळे अजितदादा गटाकडून दिलेला शब्द पुर्ण करण्यासाठी तसेच शिरुर-हवेलीचा विकास घडवण्यासाठी सामान्यातील सामान्य एकमेव चेहरा म्हणून जनतेकडून ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे पाहिले जात आहे याच कारणास्तव महायुतीकडून एकमताने कटके यांना मैदानात उतरवण्याची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

निमोणे येथे अनधिकृत पुतळा बसविल्याप्रकरणी २ माजी सरपंचांसह १५ जणांवर गुन्हा दाखल

शिरुर-हवेलीत कसा जमणार सत्तेचा खेळ…? आचारसंहिता जाहीर झाली तरीही महायुतीचा अजुनही नाही मेळ

निमोणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद अखेर मिटला, सामंजस्याने ग्रामसभेत निर्णय

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

12 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

12 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

12 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago