आरोग्य

मान अवघडल्यास किंवा दुखू लागल्यास हे उपाय करा

फोनवर बोलताना इअरफोन लावावे

खूप जास्त वेळ फोनवर बोलावे लागत असेल तर फोन हातात पकडून, गाल चिकटवून बोलण्यापेक्षा हेडफोन्स किंवा इअरफोन्स वापरावेत. त्यामुळे मोबाईलच्या रेडिएशनमुळे बचाव होईल. तसेच मान किंवा खांद्यांच्या वेदनांची समस्या भेडसावणार नाही.

वाकून काम करू नका

ऑफिसमध्ये काम करताना कॉम्प्युटरवर काम करत असाल तर शरीर झुकवून काम करू नये. आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनची उंची डोळ्याच्या उंचीइतकी ठेवावी. जेणेकरून शरीर आणि मान खालच्या बाजूला वाकू नये. वाकून काम केल्याने मानेच्या वेदना होतातच; पण भविष्यात मणक्याच्या हाडांशी निगडीत समस्या निर्माण होतात.

उंच उशीचा वापर नको

झोपताना उंच उशीचा वापर करीत असाल तर मानदुखी होऊ शकतो. वेदना होत असल्यास झोपताना उशी घेऊ नये. उशी वापरायची असेल तर विशेष स्वरूपाच्या सर्व्हायकल उशांचा वापर करावा. ही उशीदेखील अतिउंच नसावी किंवा अतिपातळही नसावी. या उशीचा वापर करून मानेला आराम मिळाला पाहिजे.खुर्ची आणि सोफा यावर योग्य पद्धतीने बसा : खुर्ची आणि सोफ्यावर आडवे-तिडवे बसू नका. त्यामुळे मानेच्या समस्या होतात. खुर्ची किंवा सोफ्यावर बसताना योग्य पद्धतीने बसावे. शक्यतो कायम ताठ बसावे, तसेच खुर्चीवर एकाच पद्धतीने बराच काळ बसू नये. मानेच्या स्नायूंना आराम मिळण्यासाठी अधूनमधून थोडा वेळ आराम करावा, मानेचे व्यायाम करावेत.

मान दुखू लागल्यास बर्फाने शेकावे 

मानदुखीमध्ये बर्फाने शेकल्यास लवकर आराम पडतो. त्यासाठी बर्फाचे तुकडे कापडात बांधून वेदना होणार्‍या जागी शेकावे. त्यामुळे सूज कमी होते. मान दुखत असल्यास मानेचे लिंगामेेट आणि स्नायू यांनाच इजा होते. इजेपासून आराम मिळण्यासाठी मानेला आराम द्यावा. त्यामुळे इजा झाल्यानंतर कॉलरचा वापर करावा. जेणेकरून मान वळवताना लागणार्‍या झटक्यांपासून मानेचे संरक्षण करता येईल.

मसाज आणि शेकणे

मानेच्या वेदना होत असतील तर कोमट तेलाने मालिश करावे. त्यामुळे आराम मिळतो. मालिश करताना नेहमीच मानेकडून खांद्याच्या दिशेने करावी. मालिश केल्यानंतर गरम पाण्याच्या पिशवी किंवा काचेच्या बाटलीत गरम पाणी भरून शेकावे. शेकल्यानंतर मोकळ्या हवेत जाऊ नये किंवा थंड पाणी पिऊ नये.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago