शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे गावात ग्रामपंचायत कार्यालयाकडुन कोणतीही परवानगी न घेता मुख्य चौकात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याने दोन माजी सरपंचासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन याबाबत ग्रामसेवक बाळासाहेब बबनराव शेळके (वय ५३) रा. आंबळे ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बाळासाहेब शेळके हे ऑगस्ट २०२२ पासुन निमोणे गावात ग्रामसेवक म्हणून नोकरी करत आहेत. दि १२ ऑक्टोबर २०२४ रोजी निमोणे ग्रामपंचायत कार्यालयात जात असताना शिरुर ते निर्वी रस्त्याच्या कडेला, मारुती मंदिर चौकात, गावठाणच्या जागेत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याचे त्यांनी पाहिले.
सदरचा पुतळा बसविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडुन कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याने त्यांनी हा पुतळा कधी व कोणी बसवला याबाबत निमोणे गावच्या पोलीस पाटील इंदिरा बापु जाधव यांच्याकडे चौकशी केली असता १) शामकांत राजहंस काळे २) संजय ज्ञानदेव काळे ३) भाऊसाहेब भागचंदं काळे ४) संतोष ज्ञानदेव काळे ५) गोरक्ष नाना काळे ६) संदिप किसन काळे ७) विजय खंडू पोटे ८) दिलीप चंदर काळे ९) अक्षय धोंडीबा दोरगे १०) संतोष माणिक जाधव ११) प्रविण बाबुराव दोरगे १२) संदिप अर्जुन गव्हाणे १३) सागर दिलीप काळे १४) श्रीकांत प्रकाश दोरगे १५) नागेश रघुनाथ काळे १६) शिवाजी राजाराम जाधव १७) प्रमोद वसंत जगताप (सर्वजण रा.निमोणे, ता.शिरुर, जि.पुणे) या आरोपींनी रात्रीचाच अनधिकृतरीत्या पुतळा बसविल्याचे त्यांना समजले.
त्यानंतर बाळासाहेब शेळके यांनी याबाबत शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांच्याशी सदर प्रकाराबाबत चर्चा करुन शिरुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असुन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिवाजी बनकर हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
शिरुर तालुक्यात नॉनव्हेज खाताय…? मग इकडे लक्ष द्याच…
कारेगावचे उपसरपंच तुषार नवले यांना लागली प्रभारी सरपंचपदाची लॉटरी
शिरुर पोलिसांनी गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला केले गजाआड