मुख्य बातम्या

Video; ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या लढयाला अखेर यश शिक्रापुर पोलिसांकडुन ‘त्या ‘खुनाचा गुन्हा उघड

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर पोलिस स्टेशनमधील बहुचर्चित ‘अज्ञात’ व्यक्तीच्या खुन प्रकरणी त्याच पोलिस स्टेशनमधील ‘खत्री’ नामक पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार अर्ज दिल्यानंतर ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने निर्भिड व सडेतोडपणे सातत्याने बातम्यांच्या माधमातुन आवाज उठवला होता. या लढयाला अखेर यश आले असुन एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा केला असुन महिलेसह चार जणांना तातडीने गजाआड करण्यात आले आहे. यातील एक आरोपी फरार आहे.

शिक्रापुर पोलिसांनी तत्परतेने गुन्ह्याची उकल करत माधव दशरथ करडे (रा.सुंब,ता. बार्शी जि. सोलापूर हल्ली रा. सणसवाडी ) या इसमाचा खुन झाल्याचे निष्पन्न करत एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा केला असुन महिलेसह चार जणांना तातडीने गजाआड करण्यात आले असल्याची माहीती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी दिली आहे.

 

या गुन्हयाची उकल होणे कामी पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले हे दोन दिवस शिक्रापुर पोलिस स्टेशनला ठाण मांडुन होते. अखेर ‘अज्ञात’ मयत व्यक्तीला न्याय मिळवुन देत खुनाला वाचा फोडल्याने ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ चे विशेष प्रतिनिधी तसेच शिरुर तालुका ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हाध्यक्ष अरुणकुमार मोटे, आणि शिक्रापुर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी गजानन खत्री तसेच ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ चे संपादक तेजस फडके यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

धक्कादायक; खुनाच्या आरोपीला आर्थिक तडजोड करत वाचवण्याचा शिक्रापूरच्या पोलिस अधिकाऱ्याचा प्रयत्न…?

शिक्रापुरचे पोलिस कर्मचारी ‘खत्री’ यांच्या भांडाफोडने खुना ची उकल होणार का…? वरीष्ठांच्या तपासावर प्रश्नचिन्ह…?

शिक्रापुरच्या ‘त्या’ मयताचा खुन होण्यास अवैध धंदा कारणीभुत…?

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago