शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुरच्या बहुचर्चित खुन प्रकरणाची उलटसुलट चर्चा शिरुर तालुक्यासह पुणे जिल्हात चांगलीच रंगली आहे. खुनाला वाचा फुटते हे वाक्य पोलिस कर्मचारी ‘खत्री’ यांच्या रुपाने सिद्ध झाले आहे.
‘शिरूर तालुका डॉट कॉम’ ने निर्भीड, सडेतोडपणे हे प्रकरण चांगलेच उचलुन धरल्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठा पाठिंबा दिला आहे. तसेच या प्रकरणी ‘बातमी’ थांबविण्यासाठी अनेकांचे फोन ही आले. परंतु या प्रकरणात न थांबता सत्य परिस्थिती नागरीकांपुढे, वरीष्ठ अधिकाऱ्यांपुढे ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ मांडत आहे. यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. न्याय मिळेपर्यंत हा लढा असाच अविरतपणे पुढे चालत राहणार आहे.
शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत हातभट्टी, ताडी, गुटखा, जुगार मटका, या अवैध धदयांना ऊत आला आहे. शिक्रापुर पोलिस स्टेशन मध्ये ‘कलेक्शन बहाद्दर’ चांगलेच गब्बर झाले आहेत. शिक्रापुर परिसरातील अशाच एका अवैध धदयांवर कामाला असलेल्या कामगाराचा मालकाकडूनच खुन करण्यात आल्याची चर्चा शिक्रापुर पोलिस हद्दीत चांगलीच रंगली आहे. कलेक्शन करणाऱ्या व्यक्तिने वरीष्ठांना हाताशी धरून हा खुन पद्धतशीररीत्या पचवला असल्याची चर्चा वारंवार होत आहे.
शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारुभट्टी चालु असल्याचे सिद्ध होईल. त्यामुळे पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हे प्रभारी अधिकारी पदावरुन बदली करतील. या भितीने व सदर मयताच्या मरणाबाबत इतर कोणीही नातेवाईक अथवा वारस नसल्याचा गैरफायदा घेवुन सदरचा प्रकार शिक्रापुर पोलीस स्टेशनने दडपलेला आहे.
तसेच आरोपीकडुन आर्थिक प्रलोभनास बळी पडुन त्यांना सोडुन दिले असल्याची लेखी तक्रार पोलीस कर्मचारी ‘गजानन खत्री’ यांनी वरिष्ठांना दिली आहे. तब्बल तीन महिने उलटूनही याकडे गांभीर्याने न पाहिल्याने तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता याची दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी खरा तपास करून आरोपीला (अवैध व्यावसायिक) गजाआड करणार का…? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
(क्रमशः)
धक्कादायक; खुनाच्या आरोपीला आर्थिक तडजोड करत वाचवण्याचा शिक्रापूरच्या पोलिस अधिकाऱ्याचा प्रयत्न…?
शिक्रापुरच्या त्या दिप रतनचा खाकी वर्दीला काळीमा फासणारा लाजिरवाना पराक्रम…?