महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख गंभीर आणि अमान्य; अँड.अमोल मातेले

महाराष्ट्र शासनाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर जातीचा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे, जो अत्यंत गंभीर आणि अन्यायकारक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते एडवोकेट अमोल मातेले यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे.

एडवोकेट अमोल मातेले म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर जातीचा उल्लेख केल्याने समाजात भेदभाव वाढू शकतो, तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात समानता आणि समता राखणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरीत मागे घेतला गेला पाहिजे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी यावर त्वरित स्पष्टीकरण द्यावे आणि हा निर्णय रद्द करण्याची घोषणा करावी. अन्यथा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करून सरकारला जाग आणेल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नेहमीच सामाजिक समतेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला आहे. हा निर्णय केवळ गैरसोयीचा नसून, तो राज्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक धोरणांच्या विरोधात आहे. त्यामुळे हा निर्णय मागे न घेतल्यास, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून लढण्याचा निर्धार करण्यात येत आहे.

एडवोकेट अमोल मातेले

प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago