मुख्य बातम्या

इनामगावचे उपसरपंच सुरज मचाले यांनी वाचवले शेततळ्यात बुडणाऱ्या पाच शाळकरी मुलांचे प्राण…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पाबळ येथे काही दिवसांपुर्वी दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच इनामगाव (ता.शिरुर) येथे शेततळ्यात पोहायला गेलेली पाच शाळकरी मुलं बुडत असताना येथील उपसरपंच सुरज मचाले यांनी प्रसंगवधान राखत दाखवलेल्या धाडसामुळे हि पाच मुलं बुडताना वाचली आहेत. या पाच मुलांपैकी दोन सख्खे भाऊ आहेत. त्यामुळे सुरज मचाले यांच्यावर सगळीकडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

शनिवार (दि १५) रोजी इनामगाव येथील ओंकार किरण खरात, गौरव किरण खरात, शिवराज मनोहर कांगुने, पृथ्वीराज रविंद्र खरात, सक्षम नवनाथ खरात हि पाच शाळकरी मुलं दुपारच्या सुमारास शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. शिवराज कांगुने, सक्षम खरात, गौरव खरात हे तिघे जण पाण्यात पोहत असताना बुडू लागले. त्यांना वाचविण्यासाठी ओंकार खरात आणि पृथ्वीराज खरात हे दोघेजण शेततळ्यात उतरले. परंतु या पाचही जणांना पोहता येत नसल्याने तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडू लागले.

 

परंतु दैव बलवत्तर म्हणुन नेमक याचवेळी इनामगावचे उपसरपंच सुरज मचाले हे योगायोगाने बोअरवेलची मोटार बंद करण्यासाठी आले होते. त्यावेळी हि पाचही शाळकरी मुलं पाण्यात बुडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच त्या मुलांच्या दिशेने धाव घेतली. आणि शेततळ्यात बुडणाऱ्या पाचही शाळकरी मुलांना वाचवत जीवदान दिले. त्यामुळे इनामगावसह पंचक्रोशीतुन सुरज मचाले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिरुर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हान

शिरुर; चारचाकी गाड्यांना अनधिकृत पाट्या तसेच अवैध दारुविक्रीबाबत मातंग नवनिर्माण सेना आक्रमक

शिरुर; रांजणगाव येथील अथर्व ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून १६ लाख २५ हजारांचे दागिने चोरीला

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यातील गावांमध्ये रात्रीस चाले ‘ड्रोनचा खेळ’; नागरिकांमध्ये भिती…

शिरूर (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील कान्हूर, मलठण, पाबळ, मिडगुलवाडी, वाघाळे या गावांसह विविध गावांमध्ये रात्रीच्या…

4 तास ago

रांजणगाव एमआयडीसीमधील कंपनीत कामगाराचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील झामील स्टील कंपनीमध्ये क्रेनच्या सहाय्याने मोठमोठे पार्ट उचलत…

4 तास ago

‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती : चंदन सोंडेकर

शिक्रापुर (प्रतिनिधी) 'आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,' अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर नागरीकांचे प्रश्न…

7 तास ago

शिरूर तालुक्यातील दांपत्याचे अपहरण करुन उलटे टांगून बेदम मारहाण; गुन्हा दाखल…

शिक्रापूर (प्रतिनिधी) शिरूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे.…

7 तास ago

शिरुरच्या माजी नगरसेविका ज्योती लोखंडे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश; अजुनही काहीजण इच्छुक

शिरुर (तेजस फडके) लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. महायुतीपेक्षा जास्त जागा जिंकल्याने…

18 तास ago

शिरुर नगरपरिषद हद्दीमध्ये अनधिकृत गॅस पाईप लाईन त्वरित बंद करा; मनसेची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) नागरी भागातून म्हणजेच कोणत्याही कायद्‌यान्वये गठीत करण्यात आलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

20 तास ago