मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील दांपत्याचे अपहरण करुन उलटे टांगून बेदम मारहाण; गुन्हा दाखल…

शिक्रापूर (प्रतिनिधी) शिरूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. एका दांपत्याचे अपहरण करीत चारचाकी गाडीत काळूस (ता. खेड) येथे नेऊन दोघांना हातपाय बांधून, उलटे टांगून अमानुषपणे मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सदर मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांकडून उत्तरसिंग मनावत (राठोड), विकी मनावत (राठोड), अजय मनावत (राठोड), सचिन मनावत (राठोड) (सर्व रा.काळूस, ता.खेड) यांचेसह दहा ते पंधरा अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कान्हुर मेसाई येथील सत्यसिंग चंद्रसिंग कर्मावत याने काळूस येथील उतरसिंग मनावत याच्याकडून काही दिवसांपूर्वी पैसे उसने घेतले होते. सदर पैसे वेळेत परत दिले गेले नसल्याने उत्तरसिंग हा रविवारी (ता. २३) रात्री दोनच्या सुमारास त्याच्या पत्नीसमवेत सत्यासिंगच्या घरी कान्हुर मेसाई येथे गेला. तिथे त्याने ऊसणे पैसे मागण्याऐवजी ‘तुम्ही आमचे सोने चोरी केले आहे ते आम्हाला लगेच आणून द्या’ असे म्हणत त्याने थेट सत्यसिंग व त्याची पत्नी स्वप्नाली या दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने सत्यसिंग व त्याची पत्नी स्वप्नाली या दोघांना आपल्या चारचाकी गाडीत बसवून त्याने आपल्या काळूस येथील घरी आणून डांबून ठेवले. तेथे त्याने लाकडी काठी, तलवार, कोयते आदींच्या सहाय्याने मारहाण करीत सत्यसिंग याला उलटे बांधून मारण्यास सुरवात केली. या मारहाणीचा व्हिडीओही उत्तरसिंग व त्याच्या सहका-यांनी सोशल मिडीयात व्हायरल केला.

दूस-या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी (ता. २४) सत्यसिंगचा मोठा भाऊ भीमा बिरावत हा काळूस येथे आला व त्याने ‘तू माझ्या भावाला सोड, त्याने चोरी केली असेल तर मी माझा बंगला तुला लिहून देतो,’ असे म्हणत उतरसिंग याने भिमा बिरावत कडून कागदावर काहीतरी लिहून घेतले आणि सत्यसिंग व त्याच्या बायकोला सोडून दिले. सदर घटनेत सत्यसिंग चंदरसिंग कर्मावत, स्वप्नाली सत्यसिंग कर्मावत (दोघेही रा.कान्हूर मेसाई, ता.शिरुर जि.पुणे), दूरबाल बिरावत (रा.कासारी फाटा, ता.शिरुर,जि. पुणे), शिवभगत राजकुमार बिरावत (रा.बजरंगवाडी, ता.शिरुर,जि.पुणे) हे जखमी झाले आहे.

सत्यसिंग याने शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी उत्तरसिंग मनावत (राठोड), विकी मनावत (राठोड), अजय मनावत (राठोड), सचिन मनावत (राठोड) यांसह दहा ते पंधरा अनोळखी युवक (सर्व रा.काळूस,ता.खेड) यांच्या विरुद्ध अपहरण, मारहाण, शिवीगाळ आदींचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव वाबळे करीत आहेत.

शिरुर तालुक्यात कंपनीचे शटरचे लॉक तोडून ३७ लाख ६४ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल लंपास

शिरुर तालुक्यात विद्युत रोहीत्र चोरी करणारी टोळी अखेर गजाआड, तब्बल ४८ गुन्हे उघडकीस

शिरुर तालुक्यात अपहरण करुन खुनाचा प्रयत्न; तीन आरोपींना अटक

शिरुर तालुक्यात बंदूकिचा धाक दाखवत एका व्यक्तीचे अपहरण करुन जीवघेणा हल्ला…

राजकारण! पंच्याहत्तर वर्षीय उपसरपंचाचे केले अपहरण; कारण…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

4 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

8 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

10 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago